पान:विद्यार्थि धर्म.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दहावें. ]
शिष्टाचार व व्यवहार.

९७


अर्थपूर्ण रूढ झाल्या आहेत. कारण वरील व्यवहारांत काय काय लागते, कुणाकुणाचा संबंध येतो, कोणत्या अडचणी येतात, हें प्रत्यक्ष चांगलें कळतें.

 शिष्टाचार हा एक व्यवहारांतील मोठा भाग आहे. शिष्ट लोक अनेक प्रकारच्या व्यवहारांत कसकसे वागतात, पाहून त्यांसारखें वर्तन ठेविले पाहिजे, कोणी घरों परका मनुष्य आला तर त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे " या बसा " ह्मणणे, कोणी मनुष्य नेहमी प्रमाणें कांहीं कामाकरितां आला तर त्याचे ह्मणणे ऐकून त्याचे काम करून त्याला वाटेस लावणें, घरांत चारदोन माणसे जेव्हां जेवायला येतील, तेव्हां आपल्या योग्यतेप्रमाणें एकादे काम शिष्टांना पसंत पडेल असें करणें, कीर्तन, पुराण, सभा, व्याख्यानें, परिषदा, यात्रा, उत्सव - जेथे स्त्रीपुरुष समुदाय एकत्र होतो, भिन्न भिन्न समाज एकत्र होतात - या प्रसंगी जे जे शिष्टाचार असतील, ते सर्व समजून घेऊन त्याप्रमाणे वागणें; या गोष्टी विद्यार्थ्यांच्या अभ्यासांतल्याच आहेत. कीर्तनाला गेल्यानंतर आधीं देवाला नंतर बोवाला नमस्कार करून बसण्याचा शिष्टाचार आहे. परंतु कित्येक देवाकडे व बोवा- कडे न पहातां एकदम मध्येच जाऊन बसतात. सभा किंवा परिषदा या ठिकाणी सभ्यतेने वागावें, सभेला तिकीट असल्यास तें न काढतां जाणें, तिकीट एका दर्ज्याचें असून दुसऱ्याच ठिकाण बस व त्याकरितां स्वयंसेवकाशी भांडणे, असले अशिष्ट व्यवहार करूं नयेत. कोणत्याही कार्याला एक शिस्त पाहिजे ह्मणजे तें कार्य चांगले होतें. शिष्टाचार ह्मणजे कार्यसौकर्याकरितां शिष्टांनी घालून दिलेली एक प्रकारची शिस्त होय. कोणचीही शिस्त पाळल्याने कोणाला कमीपणा येतो, अशांतला भाग नाहीं. भोजनासारख्या साध्या गोष्टीत सुद्धां सर्व वाढप झाल्यावर " पार्वतीपते " किंवा " पुंडलीक वरदा झटल्यावर भोजनास प्रारंभ करण्याचा शिष्टा- चार आहे. हा शिष्टाचार जर मोडला, तर वाढप अव्यवस्थित होते व जेवणाचा बेत बिघडतो. शिष्टाचाराच्या पुष्कळच गोष्टी
१३