पान:विद्यार्थि धर्म.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
विद्यार्थि-धर्म.

[ प्रकरण


हातून गेले ह्मणजे त्यांचा वाऊही वाटत नाहीं आणि त्यांत कुतूहलही उरत नाहीं. पत्रव्यवहाराचा प्रसंग आल्यास आईला तीर्थरूप सौभाग्यवती हाणावे कां गंगा भागीरथी हाणावे, हा प्रश्न पडतोच; आणि व्यवहारशून्यपणा पदरीं येतो.

 घरांतले सण, उत्सव, कुलधर्म, कुलाचार या सर्व गोष्टींत विद्या- र्थ्यांनी चांगले लक्ष्य घातलें पाहिजे. पाडव्या दिवशीं ध्वजारोपण करणें, लिंब आणून कुटून सर्वांना देऊन पंचांग श्रवणाचा व्यवहार उरकणें, वेंदूर किंवा पोळ्याचे दिवशीं घरांत जनावर असल्यास गावांतल्या चालीरीती प्रमाणें घरीं सर्व करणें, आषाढ वद्य अमावास्येचे दिवशीं दिव्याची पूजा, गणेश चतुर्थीच्या व नवरात्र बसण्याच्या पूर्वी देवघरास चुना लावणें, घटस्थापना झाल्यानंतर घटाकरितां माळा- तयार करणें, श्रावणमासीं बहिणीची अगर भावजयीची मंगळागौर असल्यास त्यांत भाग घेणें, ह्रीं सर्व विद्यार्थ्यांची कर्तव्ये आहेत. एकादशी, महाशिवरात्र, संकष्टी, अशा व्रतावैकल्यांच्या दिवशीं घरांतील शिष्टचारा प्रमाणे वागले पाहिजे, विद्यार्थ्यांनी फारसे उपास- तापास करू नयेत. तथापि पंत्रवड्याची एकादशी, महाशिवरात्र, गोकुळ अष्टमी, असे उपवास करण्यास हरकत नाहीं. पंत्रवड्याच्या एका खडखडीत उपवासाचें आरोग्यदृष्टयाही महत्व आहे. खेड्यांतले विद्यार्थी अभ्यासाकरितां शहरांत गेलेले असोत किंवा टी करितां घरी आलेले असोत; ज्यांना ज्यांना या सर्व व्यवहाराचें 'जेथें जेथें शिक्षण मिळणे शक्य असेल, तेथे त्यांनी मिळविण्याची संधी मा नये.

 घरांत कांहीं कार्यप्रस्थ उपस्थित झालें, तर थोडेबहुत अभ्यासाचें नुकसान करूनही विद्यार्थ्यांनीं कामें केली पाहिजेत. लहान भावाची मुंज अगर बहिणीचे लग्न, किंवा दुसरें कांहीं मंगलकार्य असलें कीं बाजारहाट करणें, घरसारवणें, रंगदेणें, पत्रव्यवहार करणें, मजूरांकडून कामें करवून घेणे, अशी कितीतरी प्रकारची कामे करावी लागतात. घर बांधून पहावें, विहीर खणून पहावी, लग्न करून पहावें, या हाणी