पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




ठेवून जर त्या उपयोगांत आणल्या तर सध्यां त्यांच्या हातून होत असलेल्या कामापेक्षां अधिक काम ते करूं शकतील व त्यांस किफायतही जास्त होईल. परंतु प्रायः हे कामकरी लोक अक्षरशून्य व गरीब असतात, त्यामुळे त्या सुधारणांचा उपयोग त्यांस करून घेतां येत नाहीं; इतकेंच नव्हे तर त्यांस भांडवल देणारे व त्यांचेकडून काम करून घेणारे व्यापारी लोक सुद्धा असल्या गोष्टींकडे लक्ष पुरवीत नाहींत. अशा रीतीनें नवीन युक्त्यांचा फायदा न मिळाल्यामुळें त्या लोकांस माल पुष्कळ काढतां येत नाही, व म्हणून स्वस्त विकतां येत नाहीं. इतर ठिकाणीं भांडवलवाले लोक कोष्टी लेकांना सल्ला मसलत देण्याकरितां व नवीन यंत्र शोधून काढून त्यांचें काम सोपें करण्याकरितां एंजीनियर लेक आपले पदरीं ठेवितात. त्यामुळे त्यांस आपला माल स्वस्त विकून पुष्कळ फायदा मिळवितां येतो. सध्यां सरकारानें योग्य विचार करून ह्या कोष्टी लेकांना सल्ला मसलत देण्यास एका तज्ज्ञ माणसाची योजना केली आहे असें समजतें.
  शाळा जास्त काढण्याच्या आमच्या सूचनेस यामुळे चांगलाच दुजोरा मिळाला आहे. विणकामाच्या शाळा जास्त निघून जसजसा शाळांचा उपयोग कोष्टी लोक घेत जातील तसतशी सुधारणांची मुळे जास्त खोल जातील व नवीन शोध लावण्याचें सामर्थ्य आमचे कोष्टी लोकांत येईल. वरील विवेचनावरून लक्षांत येईल की, सध्यां ह्या धंद्यांत शिकलेल्या माणसांची फार जरूर आहे व त्यांस हा धंदा फायदेशीरही होणार आहे. इंग्रजी चार पांच