पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



घेऊन चांगलें कापड पुष्कळ विकणें हेंच व्यापाराचें खरं तत्त्व आहे. स्वदेशी म्हणून माती पदरांत बांधून गिन्हाईकापासून पैसा मात्र पुष्कळ घेणें, हा धंदा फार दिवस टिकाव धरणारा नाही. व्यापारीधोरणावर धंदा केला पाहिजे म्हणजे तो नेहमीं चालतो. बॅसेलमिशनमधील लोक फार कापड तयार करितात, व त्याचा खपही विशेषतः कापडाच्या टिकाऊपणामुळें अतिशय आहे. ते सुद्धां साधे फ्लायशटल मागच वापरतात. परंतु इतर युरोपीयन संस्थाप्रमाणेंच त्यांची शिस्त फार उत्तम आहे; त्यामुळे विणक-यांस इतर कारखानदारांपेक्षां किंचित जास्त वेतन देऊन सुद्धां पुष्कळ फायदा मिळवितात. त्यांचे विणकरी इतके तरबेज झालेले आहेत कीं ते काम करीत असतां पाहिलें तर वाफेचा माग चालू आहे असा भास होतो.
  कोइमतूर, सालम, मद्रास व तलम कापडाकरितां प्रसिद्ध असलेल्या इतर गांवीं हीच स्थिती आहे. मागही साधेच आहेत. परंतु विणकर लोक इतके चलाख असतात कीं, बारीक सुताचें काम सुद्धां फारच सफाईनें व जलदीनें करितात, त्यांची दृष्टी इतकी बसून गेलेली असते कीं, क्वचित एखादा तुटलेला दोरा ते निमिषमात्रांत जोडून घेतात व काम बिलकूल न थांबतां चालू ठेवितात. अशी चलाखी येण्यास त्यांस त्या कामाचा व्यासंग लहानपणापासूनच असतो हें मुख्य कारण आहे. या लेोकांना आटोम्याटिक लूमवर फार उत्तम काम करितां येईल. इकडील कोष्ट्यांनी मागांमध्यें वेळोवेळीं होत गेलेल्या सुधारणांकडे लक्ष