पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


इयत्ता शिकून, किंबहुना एखादी परीक्षा पास होऊन सुद्धां कांहीं जेोखमीचे खात्यांत १२ तास रात्रीं अपरात्रीं काम करून दरमहा १५ रुपये मिळविण्यापेक्षां हा विणकामाचा स्वतंत्र उद्योग हलगर्जीपणा न करितां रोज ८ तास केला तर दरमहा २० पासून २६ रुपयेपर्यंत मिळण्यास मुळीच हरकत पडणार नाही. नोकरींत असतां जर्से ताबेदारीनें व विनचूक काम करावें लागतें तसंच वर्ष सहा महिने या धंद्यांत काम केल्यास हिम्मतदार उमदवारांस स्वतःचें भांडवल-कर्ज न काढतां-उभारून लहानसा कारखाना काढणें मुळींच अशक्य नाहीं. स्वतः काम करणारा कारखानदार असला म्हणजे कारखाना चांगला चालतो हें नवीन सांगणें नलगे. हातमागावरील कापडास गि-हाईक फार आहे याचें कारण वर सांगितलेंच आहे. यावरून माल तयार केल्यास खप होईल किंवा नाहीं या प्रश्नाचा विचार करण्याची जरूर रहात नाहीं. त-हतऱ्हेचा माल काढला म्हणजे तो फारच खपतो हें मॅंगलोर चेक्सच्या खपावरून सिद्ध होत आहे. फ्लायशटल मागावर काढतां येण्यासारखे व्यवहारांत नेहमीं लागणा-या कापडांचे नमुने विणकरांच्या नेहमीं नजरेसमोर रहातील अशी व्यवस्था झाली पाहिजे. यामुळे विणकर लोक ती माल तयार करतील व गिरणीत होऊं शकत नाही असें नक्षीचें काम लोकांचे नजरेस आलें म्हणजे त्याचा खप चांगला होईल. साधे विणकाम चांगलें येऊं लागल्याशिवाय भनगडीचे नमुन तयार करण्याची घाई करूं नये असें आमचें मत आहे. निरनिराळ्या प्रकारच्या कांठांचे काम काढण्यास कांहीं