पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




करीत बसावें लागतें. अशा रीतीनें सर्व काम शिकण्यास फार वेळ लागतो व उमेदवारांस कंटाळा येऊन व दुस-या अनेक कारणांमुळे तो प्राय: तें काम सोडून जातो. असा प्रसंग होतकरू उमेदत्रारांस न यावा व ज्यांस १००॥१२५ रुपयांचें भांडवल घालतां येईल, अशांस स्वतः शिकून कारखाना काढतां यावा म्हणून हें पुस्तक आम्हीं लिहिलें आहे.
  विणकाम शिकविण्याच्या शाळा कित्येक संस्थानांतून निघाल्या आहेत. ह्या शाळांचा कोष्टी व इतर सामान्य लोकांच्या मुलांस फार उपयोग होतो. अशा शाळा जितक्या जास्त निघतील तितक्या चांगल्या, कारण त्यांमधील मुलांस माहितगार माणसांकडून शिक्षण मिळतें; त्यामुळे कामाची सशास्त्र व पूर्ण माहिती होते. या पुस्तकाचा उपयोग असल्या शाळांमध्यें होईल यांत संशय नाही. यांत फक्त साधे विणकामाची माहिती सांगितली आहे. नवशिक्यांस धोतरें, चाद्री, पासोड्या, मांजरपाट वगैरे कापड विणतां येऊं लागलें म्हणजे निरानराळ्या प्रकारचे किनारीदार, जाळीचें ट्विलचें कापड विणण्यास फार प्रयास पडत नाहीत. साधे विणकाम चांगलें पद्धतशीर करतां यावें म्हणून ह्या पुस्तकांत इतर भानगडीचे विषय घालून तें कठीण केलें नाहीं.
  नुसतें सार्धे कापड काढून सुद्धां कारखाना चांगला चालेल, परंंतु सध्यां ज्या स्थितीत कारखाने चालविले जात आहेत ती स्थिती मात्र घातुक आहे. निष्काळजीपणानें कापड काढून त्यावर फायदा मात्र फार आकारावयाचा हें उपयोगी नाहीं. मापक फायदा