पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





प्रस्तावना.



  हातमागावरील कापड जास्त दिवस टिकतें अशी खात्री पटत चालल्यामुळेंं त्या कापडाचा खप वाढला आहे व तो आणखी वाढेल अशीं चिन्हें दिसत आहेत. शिवाय कांहीं प्रकारचें कापड हातमागावर काढणेंच फार सोईचें आहे, असें तज्ज्ञांचे नजरेस आलें आहे. अशा वेळीं हातमागाच्या धंद्यास तेजी आहे असें पाहून पुष्कळ तरुण लोकांस हा स्वतंत्र धंदा करावा असें वाटतें. या धंद्यास लागणारी माहिती पुस्तकरूपानें उपलब्ध नसल्यामुळे हा धंदा करूं इच्छिणा-या लेोकांस सध्यां निघालेल्या थोड्या कारखान्यांत काम शिकावयास जाण्यावांचून दुसरा मार्ग नसतो. या कारखान्यांत फार त्रास सोसावा लागतो. प्रथमतः अशा कारखान्यांत जातांना कांहीं चमत्कारिक अटी कबूल कराव्या लागतात. त्या कबूल केल्यानंतरही कारखान्यांत शिकलेल्या उमेदवारांस सुद्धां अक्षरशून्य मजुरांप्रमाणें क्षुलुक काम पुष्कळ दिवस