पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



विणक-याचा मार्गदर्शक.
                                                                       चालली आहे. फ्लायशटल माग जसे नव्या व जुन्या मागांमधले स्थित्यंतर आहे. तशीच आम्ही या पुस्तकांत सुतास खळ लावण्याची जी तऱ्हा सांगितली आहे ती नव्या व जुन्या खळीच्या स्थिती मधलें स्थित्यंतर आहे. ही अत्यंत सोपी रीत लोकांनीं उपयोगांत आणल्यासा ताण्याचा व खळीचा जो लोकांनीं बाऊ करून ठेविला आहे तो नाहीसा होईल. व असें झालें म्हणजे हातमागाचा धंदा वाढून या धंद्यास उर्जितावस्था येईल.