पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



जाहिरात.


 या पुस्तकाचा दुसरा भाग आम्ही छापणार आहो. त्यांत रंगीबेरंगी किनारी,चित्रविचित्र वेल्बुट्ट्या, त-हेत-हेचे सुती,रेशमी लोंकरीच्या कापडाचें विणकाम, ऑटोम्याटिक माग आणि त्यासंबंधीं शास्त्रीय माहिती स्पष्ट समजूतं पडेल अशा आकृतींसह देण्यांत येईल.

आईल एंजिन्


लहान लहान कारखान्यांत या एंजिनाचा अलीकडे पुष्कळ लोक उपयोग करू लागले आहेत. परंतु या एंजिनाच्या माहितीचें देशी भाषेत एकही पुस्तक नाहीं. ही अडचण दूर करण्याच्या उद्देशनें आह्मीं हें पुस्तक लिहीत आहो.

 सूचना- हीं पुस्तकें ज्यानां पाहिजे असतील त्यांनी आपला पत्ता बालबोध अगर इंग्रजीमध्यें लिहून कळवावा व सोबत एक आण्याची तिकीटें पाठवावीं म्हणजे आम्ही त्यांचीं नांवें नोंदून पुस्तकें तयार होतांच कळवू.
पत्ता:- वैद्य ब्रदर्स, } ग्रंथकर्ता 12 कळबादेवी-मुंबई. }