पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण ६ वे.
३५

धुवुन पिळून घेतल्यावर,त्या खळत बुडविण्याच्यालायक झाल्या. खळ लावण्याचे वर जे आम्हीं उद्देश सांगितले आहेत, ते मनांत धरून खळ लावण्याचे काम करावें.
 नवशिके लोक कोष्टी लोकांची खळ लावण्याची त-हा पाहून मोठ्या गोंधळांत पडतात व हें काम मोठे अमंगळ व आपणांस अशक्य असा ग्रह करून घेतात. म्हणून आमची खळीचे बाबतीत अशी इशारत आहे कीं, जुन्या तन्हेची कोष्टी लोकांची व नव्या त-हेची व मिलवाल्यांची या दोन्ही त-हा नवशिक्यांस निरुपयोगीच आहेत. कारण कोष्टी लेोकांना ताण्याचे बीम न करितां विणायचे असतें म्हणून ते लेोक ताण्याची गुंतागुंत न होण्याकरितां ताण्याचा प्रत्येक दोरा खळ लावून ब्रशानें घांसून गुळगुळीत करतात. हें करीत असतां अनेक अडचणी उत्पन्न होतात. यामुळे मेहनत व वेळ फार लागतो; मात्र अशा प्रकरें तयार केलेले दोरे फार सफाईदार व मजबूत होतात हे आम्हांस कबूल आहे. मिलमध्यें अवाढव्य यंत्रांनी फक्त सूत खळांत बुडवून ताबडतोब वाळवून विणण्यापुरतें कडक करून बीम भारतात. त्यांच्या अवाढव्य यंत्रांनी खळ लवकर लागून बीम लवकरु होतात; परंतु या घाईच्या कृतीचा परिणाम आम्हीं या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणांत सांगितलाच आहे. मिलची यंत्रसामग्री गरीब लेोकांना विकत घेण्यास सामर्थ्य नसतें म्हणून आम्ही आमच्या पुस्तकांत जुन्या व नव्या दोन्ही त-हेच्या मधली सोपी त-हा नवशिक्यांस सांगितली व हीं पुष्कळांना तीच पसंत पडत