पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

34

विणक-याचा मार्गदर्शक.
                                                                        मागाचे कापडाकरितां करावे लागत नाहीं. उष्णदेशांत सुतास नरमपणा आणण्याकरितां खळींत स्निग्ध द्रव्यें घालतात.
                                                                      या देशांत साधारणपणें सर्वांस उपयेोगी पडेल अशी एक खळ करण्याची रीति येणेप्रमाणें:-
                                                                          एक पेटी किंवा १० रत्त्तल सुतास लागणारी खळ:- रत्तल २ तांदळांचें अगर गव्हांचे सत्व एक मोठ्या बकेटभर पाण्यांत शिजवावें. 5 तोळे मेथ्या चार शेर पाण्यांत खूप उकळून त्याची राबडी व २ तोळे बार सोप ( धुण्याचा साबु) हे दोन जिन्नस वरील शिजविलेल्या खळींत घालवे व खूप ढवळावें म्हणजे खळ तयार होईल. याप्रमाणें खळ तयार करून त्यांत भिजविलेल्या ताण्याच्या ह्यांक तीन पासून ६ तास भिजत टाकाव्या; नंतर त्या ह्यांक चांगल्या पिळून अर्धवट वाळवून, रीळ भरावे. खळीच्या अनेक रीती आहेत परंतु नवशिक्यांस ही एक रीत बस्स आहे. व हीच रीत बारीक आणि जाड अशा दोन्ही सुतांस उपयोगी पडेल.

 को-या ह्यांकस बाजारांतून आणल्यावर त्या खळीत बुडविण्यापूर्वी स्वच्छ अधणाच्या पाण्यांत बुडवाव्या व चांगल्या खळबळाव्या. ह्यांक्स चांगल्या भिजल्या, कोठे को-या राहिल्या नाहींत अशा खात्री झाली म्हणजे, त्या अधणाच्या पाण्यांतून काढून थंड पाण्यांत घालून चोळून चोळून धुवाव्या. हें धुण्याच काम फार काळजीपूर्वक केलें पाहिजे. नाहीतर ह्यांक्समधील सांदी तुटून गुंतागुंत होईल व्र सूत फुकट जाईल. याप्रमाणें ह्यांक्स