पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण ६ वे
प्रकरण ६ वें.

.

ख़ळ

 सुतास खळ देण्याचे मुख्य उद्देश तीन आहेत.
( १) कच्या सुताचे बारिक तंतू सुताच्या अंगास चिकटवून त्यांस बळकटी आणणें; (२) ताणा करितांना सुताचा पीळ कायम राखणें, आणि (३) सुतास थेोडा कडकपणा आणणें.

                                                                       वजनावर कापड विकणारे लोक कापड जास्त वजनदार व्हावें म्हणून फार खळ लावतात किंबहुना कापड तयार झाल्यावर सुद्धां त्यास खळ देतात. असें केल्यानें कापडास सफाई व तकतकीतपणा येतो. खालीं दिलेल्या खळीच्या माहितीमध्यें वरील दोन उद्देशांचा मुळीच विचार केलेला नाहीं.

 निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या पदार्थाची खळ करितात. याच कारणें हवेतील भिन्नत्व व कापडाचा कमीजास्त खप हीं आहेत. थंड प्रदेशांत परदेशांत पाठविण्याकरितां केलेल्या कापडास कसर लागू नये म्हणून प्राणीनाशक द्रव्यें घालतात. तसें हात