पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२

विणक-याचा मार्गदर्शक.


विचारानें व बिनचुक प्रत्येक काम करावें. व्यवस्थितपणा व दृढनिश्चय या दोहोंच्यां मदतीनें हा उद्योग चालविल्यास त्यांत किफायत होऊन करमणूकही होणार आहे. सफाईदार खादी, पंचे, धोतरें, कुडत्यांकरितां बारीक कापड, पांढ-या किनारीचे तलम हात रुमाल, वगैरे त-हत-हेच्या व लोकोपयेोगी मालास आज फार खप आहे, व तसा माल थोड्या भांडवलांत या पुस्तकाचे मदतानें नवशिक्यांस सुद्धां काढितां येईल. कारखानदारांसही नवीन सुधारणांचा फायदा आपले हाताखालील कोष्ट्यास देऊन सफाईदार माल लवकर काढवून घेतां येईल व तो स्वस्त विकावयास सांपडेल.

 सुशिक्षित व कल्पक माणसांनीं या धंद्यांत पूर्ण लक्ष घालून होईल तितका गि-हाईकांचा फायदा करण्याचा प्रयत्न केल्यास आपोआप या धंद्याचा उत्कर्ष फार लैंौकर होईल अशी आमची पूर्ण खात्री आहे.