पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण ५ वें.
31


 कापड टांसण्याकरितां ले प्रत्येक वेळेस सारख्याच जोराने ओढावा म्हणजे कापड एकसारखे साफ होईल. नवीन उमेदवारांनीं सावकाश परंतु बिनचूक काम करावें. कापड लवकर लवकर काढण्याचे भानगडीत पडल्यास अनेक चुका होऊन जिकीर फार करावी. प्रत्येक काम पूर्णपणें हातांतून गेलें म्हणजे कापड जलद काढण्याची संवय आपोआप होते. कोइमतूरकडील कोष्टीलेक हातमागावर जवळजवळ पावरलूम इतकें काम काढतात तरी तें इतकें उत्तम असतें की, त्याची वाहवा फार लंबवर झाली आहे. त्यांच्या कौशल्याचें कारण त्यांचा विणकामांतील अनुभव हेंच आहे. इतकी हुषारी प्रैौढवयांत शिकण-यांस येण्याकरिता त्यांनी प्रत्येक काम फारच काळजीपूर्वक करण्याची संवय लावून घेतली पाहिजे. जे कारखानदार असतील किंवा होऊ इच्छित असतील त्यांनां इतक्या जलदीनें विणता आलें तरी चालेल, परंतु त्यांनां प्रत्येक क्रिया कां व कशी करावयाची, मागाचे भाग व त्यांची कामें, चूक होण्याच्या जागा व त्या चुकांची दुरुस्ती, आपले माग व त्यावर किती काम होणें शक्य आहे, इत्यादि गोष्टींची पूर्ण माहिती पाहिजे.
 हें प्रकरण संपविण्यापूर्वी वाचकांस पुन्हां एक इशारा देणें भाग आहे, कारण आजपावेतो बरेच लोक हा धंदा कठीण व तो अज्ञान माणसांनीच करावा असें म्हणून सोडून गेले आहेत, परंतु ग्रंथकर्त्याचें मत तसें नाही. या विणकामांतील कोणतीही क्रिया करण्यांत हलगर्जीपणा किंवा कसूर केल्यास त्यापुढील सर्व क्रिया बिनसतात व कामाचा कंटाळा येतो, म्हणून आरंभापासून नीट