पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण ५ वे.
২9 

टोकें असतात, तीं टोकें कापडाच्या कांठांत घुसवून ठेवावी. व त्याबरोबर असलेली वाटोळी कडी बसवावी. सुमारें दहा इंच कापड विणल्यावर टेपलची कडी काढून क्लॉथरोलर फिरवावा म्हणजे कापड त्यावर गुंडाळलें जाईल. कापडाचें शेवटीं पुन्हां टेंपल बसवावें, व विणण्याचें काम चालू करावें.
 टेंपल काढून पुन्हां बसविण्याचा त्रास वाचविण्याकरितां त्यांंत सुधारणा झाली आहे. कांटे असलेल्या रुळाचें एक टेंपल मिळू लागलें आहे; तें क्लॉथरोलर फिरविला म्हणजे आपोआप पुढे संरकत जातें. याचा उपयोग बहुतेक कारखानदार करूं लागले ऑहेत, व तें फार सोईचें आहे.

 विणताना दोरे न तुटण्याची खबरदारी घेतली पाहिजे. क्वचित एखादा दोरा तुटला तर माग बंद करून तुटलेला दोरा सांधून घ्यावा. हें काम अवघड आहे तरी एकदां संवय पडली म्हणजे त्याची जिकीर वाटत नाहीं. विणीकडे चांगलें लक्ष ठेवून दोरा तुट्ल्याबरोबर लागलीच तो सांधून घेतला पाहिजे, नाहींतर तो आजूबाजूच्या इतर दो-यांत गुंतून ते तोडतो. तुटलेल्या दो-याचे कापडाकडील टोंक तयार झालेल्या कापडापर्यंत तोडून टाकावे. नंतर सांधकामाकरितां मागाजवळच थोडे दोरे ठेविलेले असतात त्यांपैकीं एक दोरा घेऊन त्याचें टोंक ताण्याकडील तुटलेल्या टोकास वळी मारून जोडावें व त्या वळीचा दो-यांशी ऐकजीव करावा. सांधलेल्या दो-याचे दुसरें टोंक कापडाकडील तुटलेल्या दो-याचे शेजारील दो-यास पक्के चिकटून द्यावें.