पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



विणक-याचा मार्गदर्शक.

 पेला पाडल्यावर शटल मारावें. पेला चांगला पडला असला तर तें शटल दुस-या बाजूच्या पेटीत बिनचूक जाईल. नंतर दुसरी पावडी दाबावी व डाव्या हातानें ले आपलेकडे ओढावा म्हणजे लेच्या तोंडांत बसविलेली फणी शटलनें घातलेला आडवा दोरा ठांसून बसविते. दोरा चांगला ठांसला गेला आहे असें पाहून ले पुन्हां पहिल्या जागेवर न्यावा, व शटल पुन्हां मारावें.
 वर सांगितलेल्या क्रिया एका मागून एक केल्या म्हणजे कापड तयार होत जातें. ह्या क्रियांचा क्रम चांगला लक्षांत रहावा म्हणून पुन्हां त्या देतों:--
१. शटलच्या बाजूची पावडी दाबणें.
२• शटल मारणें.
३. दुसरी पावडी दाबणें.
४. ले ओढणें व मागे नेणें.
५. पुन्हां शटल मारणें,
 आरंभीं एक एक क्रिया सावकाश करावी, घाई करूं नये. एक पावडी सेोडल्याशिवाय दुसरी पावडी दाबूं नये, व क्रियांचे क्रमामध्यें चूक होऊं देऊं नये, म्हणजे दोरे तुटून त्रास होणार नाही.
 एक दोन इंच कापड तयार झाल्यावर त्यांच्या शेवटी टेंपल (कानसडी) लावावें. टेपलच्या दोन्ही शेवटास दोन किंवा अधिक