पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण ५ वें.

२७

}

                                                                       शटलच्या बाजूस असलेल्या भोंकावर ठेवून तें तोंडाच्या श्वासानें बाहेर ओढून व्यावें तें शटल पेटीमध्यें ठेवावें.

 याप्रमाणं सर्व तयारी करून कापड विणण्यास आरंभ करावा. प्रथम ज्या बाजूच्या पेटींत शटल असतें ती पावडी दाबून पेला पाडावा. पेला चांगला पडला पाहिजे म्हणजे त्यांतून शटल निघून जातांना दोरे तोडीत नाहीं. वईच्या खालच्या बाजूंस एक लहान कांठी (हिलाजुपणे म्हणतात) बांधलेली असते ती वईशीं समांतर नसली तर पेला चांगला पडणार नाहीं. ती समांतर राहण्याकरितां तिला बांधलेल्या दो-य (ह्यांस गुद्या म्हणतात) सारख्या उंचीच्या असाव्या. पेला पडल्यावर खालचें व वरचे दोरे ताणले जाऊं नयेत, शटल सुलभ रीतीनें जाईल एवढाच पेला पडला पाहिजे. पेला फार लहान पडल्यास शटल सुताशी घांसेल व तो फार मोठा पडल्यास दोरे ताणले जातील. योग्य त-हेचा पेला पडण्यास दोन गोष्टी साधल्या पाहिजेत; (१) फणीच्या उंचीच्या मध्यभागासमेोर वयांचे डोळे असावे, (२) एक पावडी दाबल्यावर ती जितकी खालीं जाते तितकीच दुसरी पावडी वर गेली पाहिजे. खालच्या वईतील दोरे पुढे असलेल्या शटल जाण्याच्या फळीला चिकटले पाहिजेत.

 काम सुरू झाल्यावर पायाच्या धक्क्याने व ताण्याच्या जेोरानें पावड्यांच्या व वयांच्या दो-या लांबतात व त्यामुळे पेल्यांत फरक पडतो. असें होऊं नये म्हणून या कामाकरितां मुद्दाम तयार केलेल्या दोर्या (ज्यांस हील्ड कॉर्ड म्हणतात) वापराव्या. या दो-या ताणून लांबत नाहीत.