पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४
विणकऱ्याचा मार्गदर्शक.

बिलकूल सोय नाही. परंतु विणकामामध्यें सूत तुटण्याचा संभव असतो म्हणून हिशेबांत आलेल्या सुतापेक्षां शेंकडा ५ टक्के सूत : जास्त घेऊन ठेवावें, म्हणजे तूट येणार नाहीं.
 या वर दिलेल्या रीतीपेक्षां आडवें सूत किती लागेल हें काढण्याची सोपी रीत खालीं दिल्याप्रमाणें आहे.
 ८०० यार्ड कापड विणावयाचें आहे असें समजून एका इंचांत असलेल्या आडव्या धाग्यांचे संख्येस कापडाच्या रुंदीच्या इंचांनीं गुणावें, या गुणाकाराइतक्या हॅंक्स सूत ८०० यार्ड कापडाच्या आडव्या धाग्यांस लागेल. समजा कीं एका इंचांत आडवे धागे ४० आहेत व कापडाची रुंदी ३६ इंच करावयाची आहे तर --

 ४० × ३६ = १४४० हॅंक्स आडवें सूत ८०० वार कापडास लागेल. या आडाख्यावरून आपल्यास जितक्या लांबीचें कापड काढावयाचें असेल त्या लांबीचे यार्ड ८०० चा अंश करून हिशेब करावा. उदाहरणार्थ ३६ इंच रुंदीचें १० यार्ड कापड काढावयाचें असल्यास वर आलेल्या १४४० हॅंक्सनां ८० नीं भागून येतील तितक्या हॅंक्स आडवें सूत लागेल असें समजावें.
 येथें हें एक नमूद केलें पाहिजें कीं, बाजारांत सूत पेटीचे भावावर मिळतें. एक पेटी १० रत्तल वजनाची असते. त्या पेटीवर जो नंबर लिहिलेला असते त्या नंबरचें सूत त्या पेटीत असतें व तितक्याच नॉट्स (१ नॉट म्हणजे १० हॅंक्स) त्या पेटीत असतात.