पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३
प्रकरण ३ रें.


म्हणतात. प्रत्येक हॅंकमध्ये ८४० यार्ड सूत असतें. हॅंकवरून सुताचा नंबर काढतां येतो तो असा: एक पौंड वजनामध्यें जितक्या हॅंक्स भरतील तितक्या नंबरच्या सुताच्या त्या हॅंक्स असतात. उदाहरणार्थ, तीस हॅक्सचें वजन एक पौंड असलें तर त्या ३० नंबरी सुताच्या हॅंक्स आहेत असें समजावें.
 ही माहिती साधारण दिली आहे, कारण नव्या उमेदवारांस जास्त शास्त्रीय माहिती देऊन घोटाळ्यांत पाडण्याचें आम्हांस प्रयोजन दिसत नाहीं.
 मार्गे सांगितल्याप्रमाणें जाडी सूत घेऊन खादीसारखे जाड कापड विणण्यास आरंभ करावा. आपल्यास ज्या नमुन्याचें कापड काढणें असेल त्या कापडाचा एक इंच चौरस तुकडा घेऊन त्यांतील उभे व आडवे दोरे मोजावे व कापड जितकें लांब काढावयाचें असेल त्या लांबीचे यार्ड करून त्या संख्येस उभ्या दोऱ्यांच्या संख्येनें गुणावें, वा गुणाकारास ८४० नें भागावें, (कारण ८४० यार्डीची एक हॅंक होते) जो भागाकार येईल तितक्या हॅंक्स सूत उभ्या धाग्यांकरितां लागेल.
 पिकिंग ग्लासमधून दिसणा-या शॉटसला २०० नीं गुणावें, या गुणाकारास कापडाच्या लांबीच्या यार्डीनीं गुणावें, ह्या गुणाकारास कापडाच्या रुंदीच्या इंचानीं गुणावें, या गुणाकारास ३६ नीं भागावें व या भागाकारास पुन्हां ८४० नीं भागून संख्या येईल तितक्या हॅंक्स सूत आडव्या धाग्यांना लागेल.
या रीतीनें आलेली हॅंक्सची संख्या नक्की आहे. यांत तुटीची