पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५
प्रकरण ४ थे.


प्रकरण ४ थे.


सुताची मांडणी.

रूर तितकें सूत आणिल्यावर प्रत्येक हॅंक निराळी करून तें सर्व सूत १२ तास गोड्या पाण्यांत भिजत घालावें. नंतर हॅंक्स बाहेर काढाव्या व पिळाव्या, व पूर्वी सांगितलेल्या हिशेबाप्रमाणें उभ्या व आडव्या धाग्यांस लागणा-या हॅंक्स निरनिराळ्या काढाव्या.
 उभ्या धाग्यांच्या (```ताण्याच्या```) हॅंक्स खळींत (खळ करण्याची रीतेि पुढील एका प्रकरणांत दिली आहे.) दोन तीन तास बुडवून ठेवाव्या.
 आडव्या धाग्याच्या (बाण्याच्या) हॅंक्स उकलाव्या, व मग एकएक हँक परत्यावर (स्विफ्टवर) घालावी व तिचें सूत परता फिरवृन ```असारीवर``` घ्यावे. असारीवर हँक्सची टोकें गांठ मारून जोडूं नयेत, नुसतीच जोडून पिळगटून त्यांचा धाग्याशीं एकजीव करावा.

 ताण्याच्या खळीत भिजत घातलेल्या हँक्स बाहेर काढून घट्ट पिळाव्या व त्यांचें सूतही बाण्याच्या सुताप्रमाणें दुस-या एका असारीवर घ्यावे.