पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२
विणक-याचा मार्गदर्शक.


गिरणीत सूत कोणत्या प्रकारचें मिळतें, व त्याचा हिशेब कसा करावा हें आतां पाहूं.
 हिंदुस्थानांतील गिरण्यांत ६ पासून ६० नंबरापर्यंतचें सूत निघतें. सुताचा नंबर हा त्याचा जाडी किंवा बारीकपणाचा दर्शक आहे. जसजसें सूत बारीक तसतसा त्याचा नंबर मोठा.उदाहरणार्थ, सहा नंबरचें सूत म्हणजे सतरंज्या, सुताडे वगैरे-जाड कापड विणण्याचें सूत व शंभर नंबरच्या (हें इतर देशांतून आणावें लागतें) सुताचा उपयोग कोइमतुरी रुमालासारखे तलम कापड विणण्याकडे करितात. कमी नंबरचें सूत अल्प प्रयासानें तयार होतें म्हणून त्याची किंमत कमी असते, परंतु भारी नंबरचें सूत फार महाग पडतें. साधारण व्यवहारांत लागणारें कापड खपाकडे लक्ष ठेवून १० नंबरापासून ४० नंबरापर्यंतच्या सुताचे केलेलें असतें. पसोड्या, खादी वगैरे काढण्याकडे १० ते २० नंबरचें सूत वापरतात; बांड किंवा कुळंबाऊ लुगडी २० ते ३० नंबरच्या सुताची काढतात; मध्यम स्थितींतील लोकांकरितां धोतरें व लुगडी । ३० ते ४० नंबरच्या सुताचीं काढतात. जसजसें सूत बारीक तसतसा तें विणण्याचा त्रास व कुशलपणाची आवश्यकता जास्त. सूत अतिशय बारीक असलें तर नवशिक्ष्यांच्या सराव नसलेल्या हाताचे धक्यानें तें तुटून गोंधळ होण्याचा फार संभव असतो, म्हणून विणकाम शिकू इच्छिणांच्या उमेदवारांनीं प्रथम हलक्या नंबरच्या म्हणजे जाड्या सुताचाच उपयेोग करावा.
 बाजारांत सुताच्या आव्या मिळतात त्यांस हॅक्स असें