पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११
प्रकरण ३ रें.


प्रकरण ३ रें.
सूत.

 येथपर्यंत मागाचें संक्षिप्त वर्णन व त्यामधील प्रत्येक भागाची माहिती सांगितली. त्यावरून मागाचा प्रत्येक निरनिराळा अवयव कोणतें काम करतो हें ध्यानांत येईल. आतां सुतासंबंधानें विचार करूं.

 हातानें सूत काढण्याची कृती हिंदुस्थानांतील प्रत्येक मनुष्यांस चांगली माहित आहे; जानवी व धार्मिक क्रुत्यास लागणा-या वातीकरितां लागणारें सूत चातीवर किंवा तांब्याचे गळ्यावर सफाईनें व लवकर तयार केलें जातें हें पहाण्यांत येते. तरी कापड विणण्यास पुरण्याइतकें पुष्कळ सूत तयार करणें फार प्रयासाचें असल्यामुळे गिरणीत काढलेलें सूत विक्त घेणें फायदेशीर आहे. कारण तें लागेल तितकें व फारच थोड्या वेळांत तयार होतें म्हणून तें स्वस्त मिळतें. एवढेंच नव्हे परंतु सूत काढतांना गिरणीमध्यें कापसाच्या तंतूस फारसा धक्का पोहोचत नाहीं. गिरणींतील विणण्याचे कृतीमुळे मात्र तंतूस कमकुवतपणा येतो. लवकर व अल्प आयासानें सूत काढण्याचें हातानें चालविण्याचें यंत्र निघत आहे परंतु तें पूर्णावस्थेत आलें तरी कापडाकडे लागणारे सर्व सुताचा पुरवठा त्या यंत्राचे साह्यानें होणार नाहीं म्हणून गिरणीचेंच तूर्त सूत अति उपयोगी असें समजलें पाहिजे.