पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रकरण २ रें.

  विणकरानें एक पावडी पायानें दाबली ह्मणजे त्या पावडीला दोरीनें बांधलेली पहिली वई खालीं येते, व साहजिकच दुसरी वई वरतीं सरकते. व्यवस्थित दोरे लावून तयार केलेला यार्नबीम जागचे जागीं ठेविल्यावर त्यांतील विषम नंबरचे (१,३,५,७) दोरे पहिल्या वईच्या प्रत्येक डोळ्यांतून एक एक असे काढून घेतात. सम दोरे दुस-या वईच्या प्रत्येक डोळ्यांतून काढून घेतात. मग ते बाहेर काढून घेतलेले दोरे अनुक्रमानें दोन दोन फणीच्या प्रत्येक दात्यांतून काढून घेतात. यानंतर सर्व दोरे एके ठिकाणीं मिळवून ते क्लॉथरोलरला बांधून टाकतात. यार्नबीम व वया यांमधील अंतरांत समविषम दोरे निरनिराळेठेवण्याकरितां बीमच्या लांबीच्या दोन बारीक काठ्या (स स) उभ्या दोऱ्यांंमध्यें घातलेल्या असतात, त्या काठ्यांना लीज रॉड असें म्हणतात.

 विणकरानें पहिल्या वईला गुंतविलेली पावडी पायानें दाबली ह्मणजे ती वई खालीं येते व दुसरी वई चाकावरील दोरीनें वर सरकते. असें झालें ह्मणजे दोन्यांच्या खालीं वरती अशा दोन रांगा होतात व त्या रांगांमध्यें जें अंतर राहतें त्यास शेड किंवा पेला असें ह्मणतात. या पेल्यांमधून दोरा भरून तयार केलेलें शटल जावयाचें असतें; तें शटल जागेवरून हलून पेल्यांतून निघून जाईल अशा त-हेचा टोला त्या शटलला देण्याकरितां दोहींकडे दोन पिकर ठेवलेले असतात, हे पिकर एका दोरीनें जोडून त्या दोरीच्यामध्यें एक मूठ लाविलेली असते. ती मूठ उजव्या हातांत धरून डावीकडे दोरी ओढली असतां पेल्यांतून डावीकडे शटल