पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०
विणक-याचा मार्गदर्शक.


मारलें जातें. शटल मारलें जात असतां त्याच्या आंत असलेला बॉबिनवरचा दोरा सुटत जातो. तोच आडवा दोरा, व त्यांस वेफ्ट असें म्हणतात. नंतर दुसरी पावडी दाबली ह्मणजे आतांपर्यंत खालीं असलेली दोऱ्यांची रांग वरती येते. व वरती असलेली खालीं जाते. नंतर आडवा पडलेला दोरा जागच्या जागी घट्ट बसविण्याकरितां डाव्या हातानें ले आपल्याकडे ओढून दोरा टांसावा व पुन्ह ले पहिल्या जागीं नेऊन पिकरची दोरी डावीकडून उजवीकडे ओढावी म्हणजे शटल डावीकडून उजवीकडे दोरा घालील. ह्या दोन कृती एका-पाठोपाठ होऊं लागल्या म्हणजे कापड तयार होतें. थोडेसें कापड विणल्यावर, यार्नबीमला लाविलेल्या वजनांमुळें जर्से तें लांबीमध्यें ताठ रहातें तसंच तें रुंदीतही ताणून रहावें म्हणून विणलेल्या कापडाचे अलीकडे सुमारें अर्धा किंवा पाऊण इंच टेंपल (कानसडी ) लावून ठेवावी. टेंपल ही एक जोड कामटी असते व ही घातल्यामुळे कापडाची रुंदी आंकसत नाहीं व कांट दुरमडत नाहीत. तयार झालेलें कापड चांगलें होत आहे म्हणजे त्यांत दोरे तुटून किंवा गुंतागुंत होऊन खराबी होत नाहीं असें पाहून तें क्लॉथरोलरवर गुंडाळावें.
 हें वर्णन फ्रेमच्या फ्लायशटलच्या मागाचें आहे. ह्या मागास किंमत पुष्कळ पडते. गरीब व काटकसरी उमेदवारांनीं यापेक्षा कमी किंमतीचे बैठे फ्लायशटल माग वापरावे. हे माग कोष्टी लोकांसही पसंत पडत आहेत; कारण त्यांच्या उपयोगांत असलेल्या मागांच्या इतर सर्व व्यवस्था जशाच्या तशाच ठेवून फक्त ले ( हत्या) नवा लावला म्हणजे काम भागतें.