पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
विणक-याचा मार्गदर्शक.


 आतां मागाची रचना व क्रिया:--
 शेजारील पानावर दिलेल्या आकृतीवरून हे भाग कसे जोडलेले असतात. हें लक्षांत येईल.
 एक आणि दोन ह्या लांकडी चौकटी समांतर उभ्या करून त्यांत ३, ४ ह्या पट्या बसविलेल्या आहेत. ५ व ६ ह्या दोन पट्यांच्या मध्यें एक व दोन ह्या चौकटीस खांचे घेऊन त्यांत क्लाथ रोलर समांतर बसविलेला असतो. व या रूळाजवळच चौकटीच्या बाहेरल्या बाजूस विणकरास बसण्याकरितां एक फळी (ई) बसविलेली असते. एक आणि दोन ह्या चौकटीचे वरचे बाजूस रीड चा लांकडी सांगाडा ज्यास ले म्हणतात, तो ठेवलेला असतो. व या लेपुढे एक आणि दोन या लांकडी चौकटीस पट्टी मारून त्या पट्टीच्या खालच्या बाजूस कांहीं अंतरावर दोन खोबळीचीं चाकें (ड) बसवितात. ह्या चाकावर दोऱ्या टाकून त्या दोऱ्यांच्या शेवटांस एका टोंकास एक व दुस-या टोंकास दुसरी अशा दोन वया (च च) बांधतात. या वयांच्या खालील बाजूस ( छ छ ) दोऱ्या बांधलेल्या असतात. व त्या दोऱ्या विणकरांच्या पायाखालीं असणा-या पावड्यां (ट ट) स बांधतात. वया न डगमगतां खालीं वर व्हाव्या म्हणून या दोन्या वयांच्या दोन्ही बाजूंस एक लहान कांठी बांधून त्या कांठीच्या मध्यभागीं जोडलेल्या असतात. ३ व ४ या पट्यांच्यामध्यें क्लोथरोलर प्रमाणेंच यार्नबीम बसविलेला असते. व यास दोनी बाजूला ( क क ) ही वजनें लाविलेलीं असतात, हीं वजनें यार्नबीमला आवळून धरल्यामुळे उभे दोरे ताठ रहातात.