पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रकरण २ रें.


असते. व दात्याच्या खालचीं शेवटें एका पट्टीमध्यें गुंतविलेलीं असतात तिचा उपयोग उभ्या धाग्यांतून आडवा धागा गेल्यावर तो योग्य जागीं ठासून बसविण्याकडे केला जातो. ही एक लांकडी सांगाड्यांत बसविलेली असते त्यास ले किंवा हात्या म्हणतात.
 ४ बॉबिन. आडवा टाकण्याचा दोरा गुंडाळण्याकरितां एक लांकडी कांडी असते हिच्यावरील गुंडाळलेलें सूत उभ्या दोऱ्याशीं गुंतागुत न होतां त्यावरून सफाईनें जावें म्हणून ती कांडी एका कोरींव लांकडात बसविलेली असते.ह्या कोरून पोकळ केलेल्या लांकडास शटल असें म्हणतात. ह्या शटलच्या बाजूस एक भोक पाडून त्यांतून कांडीवरील देोरा बाहेर घेतलेला असतो. माग चालू नसतांना हें शटल रहाण्याकरितां मागाचे दोन्ही बाजूस दोन उघड्या पेट्या केलेल्या असतात यांस शटल बाक्सेसम्हणतात.
 ५ कृाथ रोलर. तयार झालेलें कापड गुंडाळण्याकरितां व उभे दोरे ताणून धरण्याकरितां हा एक कापडाच्या रुंदीच्या मानानें लांब लांकडी रूळ असतो. हा रूळ मागाचे चालण्याच्या धक्यानें फिरून त्यावरील कापड उलगडूं नये म्हणून त्याचे एका बाजूस खटका असलेलें दात्यांचें चाक बसविलेलें असतें त्यास रॅचेट व्हील म्हणतात.
 हें पुस्तक नवशिक्या लोकांकरितां असल्यामुळे वरील भागांचें वर्णन शास्त्रीय दृष्ट्या दिलेलें नाही. प्रत्येक भाग निरनिराळा ओळखतां येऊन तो काय काम करतो येवढें समजलें म्हणजे पुरें आहे.