पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वीणक-याचा मार्गदर्शक.


 १. यानेवीम. जितक्या रुंदीचें कापड विणणें असेल त्याच्यापेक्षां थोड्या लांबीचा रूळ घेऊन त्यावर जितक्या लांबीचें कापड विणणें असेल तितके लांब धागे एका शेजारीं एक असे गुंडाळतात.

 २. हील्ड. सूक्ष्म दर्शक कांचेनें कापडाचा एखादा तुकडा पाहिला असतां असें दिसून येईल कीं, त्याच्या समविषम या दोन उभ्या दोन्यांच्या रांगा मधून आडवा घातलेला दोरा गेलेला असतो. हा आडवा दोरा घालण्यास सोईचें पडावें म्हणून उभ्या दोऱ्यांच्या रांगांपैकीं सम व विषम दोरे आळी-पाळीनें एकदम खालीं व घर करावे लागतात. हें करण्याकरितां सम दोरे एका जाळींतून न्यावे लागतात, त्याचप्रमाणें विषम दोरेही दुस-या एका जाळींतून नेलेले असतात.त्या विशेष प्रकारच्या जाळीस वई असें म्हणतात. कापडाच्या रुंदीच्या मानानें ६ इंचांपासून ६० इंचांपर्यंत दोन लांकडाचे चपटे तुकडे घेऊन त्यामध्यें आठ इंच उंचीची जाळी जाड दोऱ्याने गुंफलेली असते व त्या जाळीचे प्रत्येक इंचामध्यें कापडाच्या जाड किंवा बारीकपणाप्रमाणें १० पासून ५० पर्यंत उभे वेढे असतात व त्या प्रत्येक वेढ्याच्या उंचीच्या मध्यभागीं एक अढी ठेविलेली असते, तिला डोळा असें म्हणतात. या वया लागतील त्या प्रमाणाच्या बाजारांत तयार करून मिळतात. म्हणून या तयार करण्याची सविस्तर कृती आमच्या या लहानशा पुस्तकांत देण्याचें प्रयोजन दिसत नाहीं.

 ३ रीड, ही एक बांबूची किंवा लेखंडी दात्यांची फणी