पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण 2 रें.

ही यांत पुष्कळ भांडवल घालून फायदा मिळवितां येईल. ही कला जाणत्या लोकांच्या हातांत येऊन तिचें पुनर्जीवन होऊ लागलें म्हणजे तिच्या अंगभूत असलेल्या रंगविणें, चिटें छापणें, डाका मलमलीसारखे तलम कापड काढणें इत्यादि कलांचा उत्कर्ष होईल. व या धांद्यांत प्रसिद्ध असलेल्या हिंदुस्थान देशाची ख्याती कायम राहील.

प्रकरण 2 रें.
माग.

 माग म्हणजे विणण्याचें यंत्र.हें यंत्र फार प्राचीन आहे. अलीकडे त्यांत पुष्कळ सुधारणा झाल्या आहेत, तरी त्यांतील मूलतत्वें कायमच आहेत. म्हणून सुधारलेल्या (फ्लायशटल) मागाचें वर्णन दिलें म्हणजे त्यांत जुन्या मागाचें वर्णन आपोआप येणार आहे.
 मागाचे मुख्य भाग ५ आहेत. ते येणेप्रमाणें:-
१. यार्नबीम (धागे व्यवस्थेशीर गुंडाळण्याकरित केलला रूळ).
२. हील्ड (वई).
३. रीड ( फणी ).
४. बॉबिन (आडवा टाकण्याचा देोरा गुंडाळण्याची कांडी).

५. कृाथ रोलर (तयार होत जाणारें कापड गुंडाळण्याचा रूळ).