पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वीणक-याचा मार्गदर्शक.


कापड हातमागावर सध्यांतरी निदान तयार होऊ शकणार नाहीं. परंतु कोष्टी लेोकांना धंदा मिळत नसल्यामुळे अर्ध पोटीं राहणा-या लोकांना हा धंदा करून उदरनिर्वाह करणयाइतकी गिऱ्हाइकी खात्रीनें मिळालीच पाहिजे.
 दुसरी गोष्ट अशी कीं, नवीन पद्धतीच्या हातमागावर कापड पुष्कळ निघूं लागलें म्हणजे तें सध्यांपेक्षां बरेंच स्वस्त विकावयास सांपडेल व नंतर कोष्टी लेोकांना देशोधडीस जाण्याचा प्रसंग न येतां आपल्या खेड्यांत राहूनच आपला धंदा करून गिऱ्हाइक मिळवितां येईल; व शेतकरी लोकांनाही कोष्टी गांवचाच असल्यामुळे धान्य वगैरे शेतांतले जिन्नस देऊन त्याच्या मोबदला गांवांतल्या गांवांतच शहरापेक्षां जास्त किंमत न देतां कापड घेतां येईल. यांतील महत्वाची गोष्ट सामान्य लोकांस समजण्यासारखी नाहीं. परंतु शास्त्रीयदृष्टया अशा मोबदल्याच्या व्यवहारांत समाजाचा फायदा असतो. ही गोष्ट तज्ज्ञास मान्य आहेच.
 वरील विवेचनावरून हातमागाचा धंदा सुधारलेल्या पद्धतीनें चालविल्यास खात्रीनें ऊर्जितावस्थेस येईल. व हल्ली गिरण्यांवर असलेला कापड काढण्याचा बोजा कमी होऊन त्यांचेकडे हात मागांस फक्त सूत पुरविण्याचेंच काम राहील;व लोकांस जास्त टिकाऊ कापड मिळू लागेल; नोकरीवरच अवलंचून न राहतां बऱ्याच गरीब तरुण लोकांना स्वतंत्र धंदा मिळेल. मात्र हा धंदा एक नवीन ट्रॅम म्हणून सुरु करून थोड्याच वेळांत कंटाळून सोडून दिल्यानें फायदा होणार नाहीं. चिकाटीनें व व्यापारी धोरणावर चालविल्यास याचा खरा फायदा कळून येईल, व भांडवलवाल्या धनिक लोकांस