पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रकरण १ ले.


 अशा रीतीनें सूत निर्जीव झालें म्हणजे कापड अर्थातच कमी टिकाऊ होतें. एक गिरणीचा व एक हातमागाचा असे सारख्याच नंबराचे देन धोतरजोडे घेऊन ते वापरून पहावे म्हणजे असें आढळून येईल कीं, हातमागावरचा धोतरजोड गिरणीच्या धोतरजोड्यापेक्षां दीडपट किंवा जवळजवळ दुप्पट दिवस टिकतो. हा पुष्कळ लोकांचा अनुभव आहे. किंमतीसंबंधानें पाहतां हातमागावरील धोतरजोडा रुपयामागें दोनपासून तीन आण्यांपर्यंत महाग पडतो हें खरें. तरी सध्यांपेक्षां जास्त हातमाग सुरु झाल्यास त्यांत साहजिकपणेंच अधिक सुधारणा होतील व तशा त्या झाल्या म्हणजे किंमती ही ब-याच अंशीं कमी होतील. ही केवळ कल्पनाच नव्हे; कारण जुन्या हातमागापेक्षां सुधारलेल्या फ्लायशटलच्या हातमागावर कापड जास्त निघतें व त्यामुळे स्वस्त विकावयास सांपडतें असें अनुभवानें सिद्ध झालें आहे.
 सध्यांच्या हातमागावरील कापडाच्या किमती कायम राहतील असें गृहीत धरून चाललें तरी सुद्धां व्यवहारदृष्टया हातमागावरील कापड घेणेंच जास्त सोईचें आहे; कारण ३० x ४० च्या गिरणीच्या ११ वारी धोतरजोड्यास २॥. रुपये पडतात व तो फार तर ८ महिने टिकतो; व हातमागावरच्या त्याच नंबराच्या व तितक्याच लांबीच्या धोतरजोड्यास ३ रुपये किंमत पडेल परंतु तो निदान १४ महिने तरी टिकेल. अशी स्थिति असतां केवळ प्रथमतः किंमत कमी पडते याच कारणानें गिरणीतील धोतरजोड, वापरणें असंमजसपणाचें नव्हे काय?
 आतां बाजारांत एकंदर जितर्क कापड खपतें तितकें