पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६५)

निवडीने सुदृढही टिकतात व दुर्बलही टिकतात पण युद्धांमध्ये मात्र शूर. धाडसी, कर्ते, व प्रबल लोक तेवढेच नेमके मारले जाऊन दुर्बलांचे प्रमाण देशात एकदम भलतीकडे वाढते. युद्धावर उत्तम तेवढेच लोक निवडून पाठवून द्यावे लागतात. व त्यांनाच मरावे लागते तेव्हा संततीनियमन करून प्रजा कमी करण्यापेक्षा लढाई करून मेलेली काय वाईट हा विचार क्षणभरही टिकणार नाही.
 पण या सर्व विचाराच्या बुडाशी Other things being equal हे जे विचार करण्यापुरते गृहीत धरले आहे तेच भ्रामक आहे. कारण असे कधीच नसते. इंग्लंड, जपान, फ्रान्स, जर्मनी, इटली यांना समबल मानणे हे अगदी भ्रामक आहे. म्हणजे अमुक देश श्रेष्ठ असे आज मुळीच सांगता येणार नाही. पण प्रत्येकाची परिस्थिती, भौगोलिक रचना, राज्यव्यवस्था, स्त्रीपुरुष- संबंध, कर्त्या पुरुषांचे प्रमाण, आर्थिक व्यवस्था या इतक्या भिन्न आहेत की, या सर्वांचा समुच्चय युद्धप्रसंगी अगदीच भिन्न प्रकारचा होत असतो. आणि ही राष्ट्रे सारखी धरली तरी अमुक एका विशिष्ट प्रसंगी कशी आहेत, हा विचार पुन्हा महत्त्वाचा ठरतो. १८०० ते १८१० च्या सुमारास फ्रान्समध्ये जर्मनीपेक्षा पंचवीस तीस लक्ष लोकच जास्त होते. पण एकट्या नेपोलियनच्या शक्तीमुळे फ्रान्सने जर्मनीलाच काय पण सर्व युरोपला धूळ चारली. उलट १८७० साली जर्मनी ४ व फ्रान्स ३।।। कोटी असा फरक असताना, म्हणजे लोकसख्या जवळजवळ सारखी असताना जर्मनीने फ्रान्सचे निर्दाळण केले. पंचवीस-तीस लक्षाच्या फरकाने असे झाले असे म्हणावयाचे असल्यास मग ती आपत्ती कधीच टाळता येणार नाही असे होईल. कारण अगदी माणसाला माणूस बरोबर असे दोन राष्ट्रांत कधीच होणार नाही. १९१४ साली जर्मनीने केमिस्ट्रीला लढाईत घेतली व दोस्तांची सैन्ये शेतकऱ्याने गवत कापावे तशी आरंभी कापली असे लॉइड् जार्जनेच आपल्या आठवणीत म्हटले आहे. तेव्हा Other things equal हे कधी काळी शक्य आहे हेच खोटे आहे. लोकसंख्येपेक्षा त्या इतर गोष्टीच निर्णायक ठरतात. म्हणून लोकसंख्या वाढविण्यापेक्षा विज्ञान. शिस्त, शिक्षण, यांच्या साह्याने लोकांना समर्थ करून ठेवणे हा एकच उपाय राष्ट्रधुरीणांना शिल्लक आहे. अर्थात पुष्कळ वेळा राष्ट्रधुरीण हे भांडवलवाल्यांच्या ताब्यात असतात व म्हणून त्यांना लढाई