पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५६)

upon exceessive production and wholesale destruction. Eugenics rests upon bringing no mordr individuals into the world than can be properly cared for and those only of the best stock. (असंख्य प्रजा निर्माण करणे व सर्रहा संहार करणे ही नैसर्गिक निवड, जेवढ्यांचे संगोपन नीट करणे शक्य आहे तेवढ्याच उच्च कुळातल्या मुलांना जन्माला आणणे याचे नाव सुप्रजाशास्त्र)
 लिओनार्ड डार्विन म्हणतो की, Parents ought not to bring more children in the world than they can reasonably hope to bring up in accordance with certain standard of living (what is Eugenics?)
 कार सांडर्स याने आपल्या पॉप्युलेशन पुस्तकात असे दाखवून दिले आहे की, राष्ट्राला प्रजा कमी करणे असले तर संततिनियमन आवश्यक आहेच; पण वाढवावयाची असेल तरीही ते आवश्यक आहे. कारण ज्या स्त्रियांना जास्त मुले होतात; त्यांची जितकी मुले जगतात, त्यापेक्षा ज्यांना कमी होतात त्यांची जास्त जगतात. म्हणजे दहांपैकी चार जगली तर सातांपैकी पाच जगतात. याचे कारण अगदी उघड आहे. दोन अपत्यांमध्ये जितके अंतर जास्त तितकी मातेची प्रकृती जास्त चांगली राहून त्यामुळे अपत्यांचे संगोपनही तिला जास्त चांगले करता येते. मागल्या काळी जेव्हा संततिनियमनाची आर्वाचीन साधने नव्हती, तेव्हा कित्येक जमातीत बालहत्येची चाल सर्रास चालू होती. त्यापेक्षा अर्वाचीन पद्धती बरी हे कोणाही सुज्ञ व अनाग्रही माणसाला पटेल असे वाटते.
 वरील सर्व विवेचनावरून असे ध्यानांत येईल का, कोणाच्याही काळी व स्थळी लोकसंख्येवर नियमन ठेवणे हे समाजाचे कर्तव्य आहे. ते नैसर्गिक पद्धतीने होऊ द्यावयाचे की आपण करावयाचे एवढाच प्रश्न. त्यालाही आपण तज्ज्ञांच्या आधारे उत्तर काढलेच आहे नैसर्गिक निवड ही आंधळी आहे. ती वाटेल त्याला मारील. तेव्हा ती टाकून देऊन सुप्रजेचा अभ्यास करून मानवाने आपल्या हातात ही व्यवस्था घेतली पाहिजे. यानेच भावी पिढी सुदृढ कार्यक्षम होईल.
 अन्न कमी पडेल इतकी प्रजा वाढू देऊ नये, या दृष्टीने विचार झाला. आता समाजातील कर्त्या पुरुषांची प्रजा कशी वाढेल व नाकर्त्यांची कमी