पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५५)

अर्थ आहे. पण आपण जर तो शास्त्रात आणू लागलो तर पदरी वेडेपणाच बांधून घ्यावा लागेल. कृत्रिम तऱ्हेने पिंडाचे रक्षण करू नये म्हणजे काय ? इस्पितळे, अनाथगृहे ही कृत्रिम, मग घरे बांधणे व कपडे घालणे हे कृत्रिम नव्हे काय ? जेनिंग्ज म्हणतो ज्या क्षणी मानवाला अग्नीचा उपयोग ध्यानात आला तेव्हाच त्याने निसर्गनिवडीत हात घातला आहे. कारण तेव्हापासून थंडीवाऱ्यापासून मनुष्य आपले व आपल्या मुलांचे रक्षण अग्नीच्या साह्याने म्हणजे कृत्रिम तऱ्हेने करू लागला. कृत्रिमता टाकून द्यावयाची असेल तर नग्न होऊन झाडाखाली राहणे याशिवाय गत्यंतरच नाही. पण हा सगळा वेडेपणा मानवाला निसर्गाबाहेर टाकण्यामुळे होत असतो. वास्तविक मानव हा निसर्गातलाच आहे व किड्यांचे किंवा पक्ष्यांचे कृत्य जितके नैसर्गिक तितकेच मानवाचेही कृत्य नैसर्गिक समजण्यास मुळीच हरकत नाही. एलिस म्हणतो - संततिनियमन हे पूर्ण नैसर्गिक असून ती उत्क्रान्तीमधली एक पायरीच आहे !
 बालमृत्यू पुष्कळ होणे चांगले, त्याने नैसर्गिक निवडीस वाव मिळून नालायक जीव मारले जातात व लायक तेवढेच शिल्लक राहातात. म्हणून प्रत्येकाने शक्य तितकी जास्त मुले होऊ द्यावी वगैरे या पंडिताचे सांगणे असेच भ्रामक आहे.
 रशियामध्ये सर्वात जास्त बालमृत्यू होतात (१९१७ पूर्वी) व नार्वेमध्ये सर्वांत कमी होतात. तरी रोगाने जास्त संहार रशियांतच होतो. जन्मलेल्या बालकांपैकी शेकड़ा पन्नास बालके रशियांत मरतात. तेव्हा ही निवड फारच कसोशीने होते, असे दिसते; व उरलेली प्रजा मोठी सुदृढ असेल असे वाटते. पण या उरलेल्या पैकी लढाईच्या कामांस शेकडा ३७ इतकेच लायक ठरले. एलिसने म्हटले आहे की, Natural selection is not a satisfactory operation from any point of view. It kills off the unfit no doubt, but it goes further and tends to render the fit unfit. (नैसर्गिक निवड ही कोणच्याही दृष्टीने चांगलो नाही. ती नालायकांना मारते हे खरे, पण लायकांना नालायक करून ठेवते हेही तितकेच खरे आहे.) डॉ. जॉर्ज कार्पेन्टरचे असेच मत आहे. सर फ्रेंन्सिन गाल्टन आपल्या आत्मचरित्रांत असेच म्हणतो (पा. ३२२-२३) Natural selection rests