पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४९)

राजकारण यांचे आक्षेप फार महत्त्वाचे आहेत. म्हणून त्यांचा या लेखात प्रामुख्याने विचार करावयाचा आहे.
 आज लोकसंख्येच्या बाबतीत समाजापुढे दोन प्रश्न आहेत. अन्न कमी पडेल, इतकी लोकसंख्या न वाढू देणे हा एक, व ती न वाढू देण्यासाठी अशी नियमने शोधून काढावयाची की त्यामुळे उत्कृष्टांची प्रजा वाढून निकृष्टांची कमी होईल, हा दुसरा.

नैसर्गिक निवड.

 या दोहोला नैसर्गिक निवड (Natural Selection) हा एकच उपाय आहे असे काही पंडितांचे मत आहे. हे क्रॅफ्ट हा त्यांत विशेष प्रमुख आहे. डार्विनिझम व रेस-प्रोग्रेस या आपल्या पुस्तकांत ह्याने आपले विचार अगदी निर्भयपणे मांडले आहेत. रोगराई, दुष्काळ, थंडी, वारा हे समाजाचे शत्रू नसून मित्र आहेत. योग्य ती माणसे जगवून बाकीची मारून टाकणे हे काम निसर्ग रोगजंतूच्या सहाय्याने चांगले करू शकतो. आपण वैद्यकी ज्ञानाने रोगजंतू मारीत आणल्यामुळे समाजाची हानि होत आहे, असे त्याचे मत आहे. तो म्हणतो, बॅसिलस ट्युबरक्युलोसिस हा क्षयजंतु मानवाचा मित्र आहे. कारण तो दुर्बल लोकांनाच ग्रासतो. समर्थांना काही करू शकत नाही. (पान ५७) त्याचप्रमाणे महारोग. Hideous as are its aspects, it must be looked upon as a friend of humanity; for the microbe of leprosy feeds upon those who are debilitated from conditions under which wealthy and strong racial development is impossible. (दुर्बळांचा तेवढा नाश करीत असल्यामुळे क्षयाप्रमाणेच महारोगही मानवाचा मित्र आहे. (पान ५१) त्याच्या मते दारू ही पण समाजाची मैत्रीण आहे. चंचल, अस्थिर प्रकृतीच्या लोकांना व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनाच ती प्यावीशी वाटते. ती जर बंद केली तर हे. लोक मरण्याचे साधनच नाहीसे केल्यासारखे होईल. (पान ७५) रा. गो. म. जोशी यांनी याच तऱ्हेची मते आपल्या हिंदूचे समाजरचनाशास्त्र या ग्रंथात प्रगट केली आहेत. बालमृत्यू पुष्कळ होणे हे समाजाला हितप्रद आहे असे ते