पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४०)

होतो म्हणून ब्राह्मणांनी समाजसुधारणा, राजकारण, वगैरे करू नये (पृ. २३६) त्यांनी क्षत्रियाचा धंदा करू नये (पृ. २५१) इ. उपदेश केला आहे.
 रा गो. म. जोशींच्या वेडगळ बडबडीचा एरवी कोणी विचारही यांच्या केला नसता पण युरोपी पंडितांचा आपल्या सांगण्याला आधार आहे, असे ते भासवीत असल्यामुळे व त्या पंडिताच्या शब्दाला वजन असल्यामुळे आपल्या लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून, जोशांच्या लिखाणाचा विचार करण्याचे मी योजिले आहे
 आज युरोपीय समाजावर एक मोठे संकट येऊ पहात आहे. उच्च राहणीचे मान फार वाढल्यामुळे महत्वाकांक्षी कर्त्या पुरुषांना लवकर लग्ने करता येत नाहीत. व उशीरा केल्यानंतरही राहाणी हीन होईल, या भीतीने त्यांना अपत्यांच्या संख्येवर नियमन ठेवावे लागते. उलट गरिबांना मदत करणाऱ्या नाना प्रकारच्या संस्था, इस्पितळे ही परोपकारबुद्धीने समाजाने चालविली असल्यामुळे दीन-दुबळयांना चांगला आश्रय मिळतो व त्याची प्रजा भराभर वाढत जाते. अशा रीतीने कर्त्या माणसांना प्रजा कमी व दुबळ्यांना जास्त असा विपरीत प्रकार सुरू होऊन आज त्यांच्या समाजात कर्त्या पुरुषांचे प्रमाण घटत चालले आहे. या संकटाचा विचार आज जवळ जवळ प्रत्येक विद्वान् मनुष्य करीत आहे. हॅवलॉक एलिस व मॅक् डुगल हे त्यांच्यापैकी पुष्कळ श्रेष्ठ दर्जाचं पंडित आहेत. त्यांनी अनुक्रमे 'टास्क ऑफ सोशल हायजीन' व 'नॅशनल वेलफेअर ॲंड डिके' या प्रश्नाचा पुष्कळ विचार केला आहे.
 मॅक् डुगलने म्हटले आहे की, खालच्या वर्गातील पुरुष महत्त्वाकांक्षी होतो. वर चढतो, तेथे तो कर्तृत्व दाखविता; पण तेथे त्यांच्या फार पिढ्या टिकत नाहीत लवकरच त्याचा निर्वंश होतो या विधानावर जोशीबुवांनी उडी मारली व त्यांनी सांगितले की, पहा. वर्णांतर, वर्गांतर, जात्यंतर हे हानिकारक आहे असे इंग्रज पंडितही म्हणतात; पण खालच्या वर्गातला मनुष्य वरच्या वर्गात गेला म्हणून त्याचा नाश झाला असे मॅक् डुगलला मुळीच म्हणावयाचे नाही. आपल्या समाजत कर्त्या महत्त्वाकांक्षी पुरुषांचाच नेमका कसा वंश-नाश होतो ते त्याला दाखवावयाचे आहे. वरच्या थरांतल्या कर्त्या पुरुषांचा वंश-नाश तर चालूच आहे. त्याबरोबर खालच्या थरातले