पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३७)

असे त्याने मुळीच अनुमान काढलेले नाही. जोशांनी ते खोटे लिहिले आहे. (हिंदू स. शास्त्र पान २२५)
 [८] समाजाच्या सर्व थरांतून चांगली कुले निवडून काढून त्याची एक जात करावी व तिच्यात सारखी भर घालीत जावे, याचा विचारी इंग्रज लोकांना ध्यासच लागलेला दिसतो. गाल्टन, मॅकडुगल यांचे विचार वर सांगितलेच आहेत. ऑस्टिन फ्रीमनचीही तशीच कल्पना आहे. मात्र ती जी एक जात होणार तिच्यात एक राष्ट्रीयत्व राहण्यासाठी इंग्रजाखेरीज बाहेरचा कोणी घेऊ नये, असे त्याने सांगितले आहे. पण एकदा या मर्यादा पाळल्यानंतर बाकी विचार फक्त कुलशुद्धाचा 'No restrictions in respect of class or caste would be entertained' (सोशल डिके आणि रिजनरेशन पान ३१८) वर्ग किंवा जात यांची बंधने मुळीच पाळावयास नको, वाटेल त्या वर्गातील घराणे चालेल.
 सम संस्कृतीच्या दोन समूहांमध्ये मिश्रविवाह निषिद्ध तर नाहीच पण अतिशय इष्ट आहे. पुढील पिढीचा जोम व कर्तृत्व त्यामुळे वाढते असे या पंडितांचे स्पष्ट मत असल्याबद्दल वरील उतारे वाचल्यानंतर कोणासही संशय राहील असे वाटत नाही. गेटस् ने एक पाऊल पुढे जाऊन या मर्यादित संकराचा आणखी एक फायदा सांगितला आहे. पर्ल व लिटूल या दोघांनी केलेल्या अभ्यासाच्या आधाराने त्याने असे सांगितले आहे की इंग्रज, आयरिश, रशियन, इटालियन, जर्मन, ग्रीक यांचे मिश्रविवाह पाहिले तर त्यांच्यात निदान पहिल्या पिढीला तरी पुत्रसंततीचे प्रमाण पुष्कळच वाढलेले दिसते. शुद्ध संतती व मिश्र संतती यांतील मुली व मुलगे यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे शुद्ध:- मुली १०० मुलगे १०६.२७. मिश्रः - मूली १०० मुलगे १२१.५६ In crosses between European races there is a higher ratio of male births at least in first generation (हेरिडिटी व युजेनिक्स पान २३०) संकराचा हा फारच मोठा फायदा आहे हे सनातन्यांनी तरी मान्य केले पाहिजे.
 संकराने प्रजा नाकर्ती होत नाही, तिचा नाश होत नाही व तिच्यात दुर्गुणही येत नाहीत. इतकेच नव्हे तर संकर हा समाजाला अत्यंत हितावह असून त्याने कर्तृत्व व जोम ही वाढून शिवाय पुत्रसंततीचे प्रमाणही वाढते