पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३६)

selected from the whole world) असे त्यांचे म्हणणे अगदी निःसंदेह आहे.
 [६] समाजांतील प्रत्येक थरांतून चांगली माणसे निवडून काढावी व त्यांची आपापसात लग्ने घडवून आणून त्यांची एक जात तयार करावी अशी स्वप्ने गाल्टनला नेहमी पडत, असे त्याच्या चरित्रांत पिअरसनने म्हटले आहे. [विभाग २ पान १२१, विभाग ३ पान २३४]
 हेरिडिटरी जीनियस या पुस्तकांत गाल्टनने एके ठिकाणी ३१ न्यायाधीशांच्या घराण्यांची माहिती दिली आहे. लक्षाधिशांच्या एकुलत्या एक मुलींशी यांतील पुष्कळांनी लग्ने केल्यामुळे व काही अविवाहित राहिल्यामुळे या घराण्यांचा नाश झाला असे सांगितले आहे. या नाशाची मीमांसा करतांना तो म्हणतो श्रीमंत एकुलत्या एक मुलींशी विवाह केल्यामुळे ही घराणी नाश पावली. आईच्या व मुलीच्या प्रसव-शक्तींत आनुवंशिक संबंध असतो. आईला मुलगा नाही म्हणून मुलीलाही झाला नाही. या विवेचनांत जातीचा, वर्गाचा किंवा भिन्न रक्तांचा मुळीच संबंध नसतांना जोशांनी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे गाल्टनच्या तोंडी अवतरणे देऊन 'अशा तऱ्हेने असवर्ण विवाह हे निर्वंशाला म्हणजे नाशाला कारण झाले.' असे खोटेच वाक्य घातले आहे. गाल्टनचे तसे मत मुळीच नाही. आणि जी मीसांसा त्याने दिली आहे, व जी दुसऱ्या एका ठिकाणी याच पुस्तकात जोशांनी पत्करली आहे, तीही चूक आहे. असे कार्ल पिअरसनचे मत आहे. आईच्या व मुलीच्या प्रसवशक्तीत आनुवंशिक संबंध नाही असे सांगून नैतिक दुराचरणामुळे असल्या घराण्यांचा नाश होतो, हे इरॅसमस डार्विनचे मत त्याने मान्य केले आहे.
 [७] हॅवेलॉक् एलिसची जोशांनी गाल्टन प्रमाणेच मौज केली आहे. ए स्टडी ऑफ ब्रिटिश जीनियस या पुस्तकात त्याने हजार कर्त्या पुरुषांच्या घराण्याचा अभ्यास केला आहे. त्यात आयरिश X इंग्लिश व वेल्श X इंग्लिश या दोन संकरांपासून ज्या प्रमाणात कर्ते पुरुष निर्माण झाले त्या प्रमाणात स्कॉच हे जवळचे असूनही त्यांच्या व इंग्रजांच्या संकरांतून झाले नाहीत असे त्याला दिसले म्हणून तो म्हणाला की, 'The Irish and the welsh are much better adopted for crossing with the English than the more closely related scotch' (२३) संकर प्रजा नाकर्ती होते