पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३५)

सावी, अमेरिकेत युरोपात एजंट नेमावे व जे कोणी अमेरिकेत येण्यासाठी अर्ज करतील, त्यांच्या कुलांचे इतिहास तपासावे व चांगले असल्यास मगच त्यांना प्रवेश द्यावा असे त्यांचे म्हणणे आहे. (पान २२४.)
 (४) गट बेटीबंद राहिले तर त्याच्यांत विशिष्ट गुणांची वाढ होते असे सांगणारा गेट्स सुद्धा मिश्रविवाहाला अनुकूलच आहे. Intermarriage of diverse strains is important, both from point of view mentioned above, and on account of the increased vigour resulting from the heterozygous condition, but there are important limitations to the width of crosses which are desirable. (हेरिडिटी व युजेनिक्स पान २२२) रक्ताच्या भिन्नतेला मर्यादा असाव्या हा गेट्सचा इषारा आहे; पण त्या मर्यादा पाळल्यानंतर भिन्न जातीत किंवा वर्गात मिश्रविवाह अगदी इष्ट आहे असेच त्याचे मत आहे.
 मॅक डुगल, माल्टन, फ्रीमन या सर्वांचे मत हेच आहे. सम संस्कृतीच्या व सारख्या रूपगुणांच्या कुलांत विवाह अवश्य घडवून आणले पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मतांनी समाजात जाती दोनच एक कर्त्या कुळाची व एक नाकर्त्यांची; व त्यासुद्धा कायम नाहीत. परीक्षण सदोदित चालू ठेवावयाचे व वरच्यापैकी कोणी हीन प्रवृत्ति दाखवू लागले तर त्यांना बाहेर घालवून खालच्यापैकी कोणी कर्तृत्व दाखविले तर त्यांना वर घ्यावयाचे. अशी त्यांच्या मते समाजरचना असावी. हा क्रम कायमचा चालू ठेवावयाचा असल्यामुळे समाजात कायमच्या जाती राहाणारच नाहीत.
 [५] समाज जगण्यासाठी त्यांत संघ व उपसंघ असलेच पाहिजेत ही जोशांची कल्पना या शास्त्रज्ञांना मान्य नाही. वर सांगितलेली कल्पना मँक डुगलने एथिक्स आणि सम् वर्ल्ड प्रॉब्लेम्स या पुस्तकात सांगितली आहे. नॅशनल वेल्फेअर आणि डिके या पुस्तकाच्या प्रस्तावनेत संवादरूपाने हाच विचार त्याने मांडला आहे उत्कृष्टांची जी जात तयार करावयाची तींत नवी माणसे घेताना त्यांचा कुलेतिहास पहिला जाईल. एकदा निवडलेल्या घराण्यातील मुलेसुद्धा परीक्षेवाचून श्रेष्ठ वर्गांत घेतली जाणार नाहीत. जास्त संधी त्यांना मिळेल यांत शंकाच नाही. पण सर्व कसोट्या उतरल्यानंतर जगतल्या कोणच्याही व्यक्तीला त्यांत मज्जाव नाही. (Admitting new members.