पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३४)

यांचे आपआपल्या जातीत जरी विवाह चालले असले तरी त्यांना सुद्धा करतील. त्यांचा कटाक्ष कुलापुरता आहे. समान संस्कृती, समान रूपगुण, समान कर्तृत्व असे दिसेल व कुळांमध्ये इतर काही दोष नसेल तर कोणाच्याही दोन कुलांनी जात किंवा वर्ग यांचा विचार न करता आपापसांत विवाह करण्यास हरकत नाही, असे त्यांचे मत आहे.
 (१) औट स्पोकन एसेज (पान १६१) यामध्ये डीन इंगने असेच मत दिले आहे. Continued inbreeding in a small society is certainly prejudicial. Probably alternate periods of fusion with immigrants and stabilising the results, give a nation the best chance of producing a fine type of men and women (कायम आपल्या जातीत विवाह करणे हा दुराग्रह आहे. मधून मधून बाह्यांशी विवाह करावे, ते रक्त चांगले मिसळू द्यावे व मग पुन्हा मिश्रण करावे. अशाने देशांत तेजस्वी स्त्री-पुरुष निर्माण होण्याचा जास्त संभव आहे)
 (२) कॅसलने हेच मत जेनेटिक्स व युजेनिक्स या ग्रंथात दिले आहे. (पान २७२). The mixtur of elements not too dissimilar provided the social heritage is not unduly disturbed, is on the whole beneficial. It results in the increase of vigour and energy in the offspring. सामाजिक पीठिका मोडत असल्या तर विवाह करू नये हा मुद्दा कॅसलने चांगला सांगितला आहे पण हा सोईचा प्रश्न आहे. एरवी असल्या संकराने पुढील प्रजा जास्त कर्ती व तेजस्वी होते असेच तो म्हणतो
 (३) आपल्या देशांत (अमेरिकेत) हीन प्रतीचे लोक येऊ देऊ नये, हे सांगून कोणाला बंदी करावी हे सांगतांना डेव्हन पोर्ट म्हणतो. In fact no race is dangerous and none undesirable; but only those individuals whose germinal determiners are, from the stand point of life, bad. In other words immigrants are desirable who are of good blood and undesirable who are of bad blood. (हेरिडिटी इन् रिलेशन् टु युजेनिक्स पान २२१) येथे डेव्हन पोर्टने अमुक व्यक्ती त्याज्य असे म्हटले आहे. जात त्याज्य असे सांगितले नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे. रक्तशुद्धी त्यास हवी आहे; पण त्यासाठी कुले तपा