पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२१)

 A gene mutation is a sudden change in a restricted region of a chromosome, resulting in the appearance of a new gene while other germinal variations may be due to changes in numbers, arrangement or balance of chromosomes. (आवृति सन १९३५ पान ३२३)
 Evolution of living organism या पुस्तकांत (सन १९१२ पान ४८) E. S Goodrich F. R. S. हा म्हणतो की,- At some period in evolution new factors must have been introduced into the inheritance and the process is presumably still going on.
 ज्यूलियन हक्स्ले व एच्. जी. वेल्स यांनी आपल्या Science of Life या ग्रंथांत (१९३० पान ३६०) या फरकांचा विचार केला आहे. कांही विशिष्ट प्रकारच्या प्रकाशकिरणांनी प्राण्यांच्या जीवनगोलकांत फरक पाडता येतो, असे सिद्ध झाले आहे, असे सांगून ही प्रक्रिया सृष्टीतही चालू असावी असे त्यांनी आपले मत दिले आहे. व हीच उपपत्ती एच्. एस्. जेनिंग्ज् याने आपल्या The Biological Basis of Human Nature या पुस्तकांत मान्य केली आहे. तो म्हणतो-
 There is no reason for doubting that gene mutations occur in man as they do in other organisations. A race of men will in the course of time become heterogenous through occurrence of mutations, quite without mixture with another race. Doubtless much of the variety in human population is due to this cause.
 नसलेले गुण निर्माण होतात असे फार तर म्हणू नये, पण हजारो वर्षे ज्ञात नसलेले गुण एकदम दिसू लागून वंशाचे गुणधर्म बदलतात असे शास्त्रज्ञ स्पष्ट म्हणत आहेत. आणि हजारो वर्षे जे गुण दिसले नाहीत, ते नव्हते असे म्हणण्यास तरी अडचण कोणची. संकर न होता एका शुद्ध वंशात फरक पडत जाईल हे जेनिंग्ज् चे वचन अगदी निःसंदेह आहे. तरी 'आपोआप फरक पडत नाहीत, नसलेले गुण निर्माण होत नाहीत,' अशी वर सांगितलेल्या गो. म. जोशांची भुणभुण चालूच आहे. (हिं. स. शास्त्र पाने ४०३-४) वर सांगितलेला फरक हा एका पिढीपुरता नसून आनुवंशिक होत जातो,