पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१०)

चमकु शकलेच असे एका पक्षाचे म्हणणे आहे व उच्च गुण हे कुळातच सापडणार अन्यत्र सापडणारच नाहीत, असे दुसरा पक्ष म्हणतो.
 Behaviourism या पुस्तकात वॅटसन म्हणतो,- 'Give me a dozen health infants, and my own specified world to bring them up in, and I will guarantee to take any one at random and train him to become any type of specialist I might select-Doctor, Lawyer, Artist, Merchant Chief and yes, even beggar-man and thief, regardless of his talents, peculiarities, abilities and race of his ancestors' (पान ८२) हे तत्त्व गृहीत धरून समतावादी समाजरचना करू पाहातात.
 कोणच्याही कुटुंबात पाहिले तरी साधारणतः वर्ण, स्वभाव, बुद्धिमत्ता यावतीत मुले आईबापांच्या सारखी असतात. सामान्य दृष्टीलासुद्धा हे साम्य पुष्कळ वेळा दिसून येते. पित्याचे गुण पुत्राच्या ठायी उतरण्याचा हा जो सृष्टीचा साधारण नियम दिसतो, त्याला आनुवंश असे म्हणतात. मनु व आपल्याकडचे इतर सर्व स्मृतिकार यांचा या आनुवंशाच्या तत्त्वावर निःसीम विश्वास असून त्या अन्वयेच त्यांनी आपली समाजरचना सांगितली आहे. रूसो, कार्ल मार्क्स वगैरे लोक या तत्त्वाला मुळीच किंमत देत नाहीत.
 गेल्या पन्नाससाठ वर्षात युरोपात जीवनशास्त्राचा व तदंतर्गत आनुवंशाचाही पुष्कळच अभ्यास झाला व तेव्हापासून बायॉलजी हे शास्त्र इतर शास्त्रांच्या तोडीचे किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे असे तिकडील पंडितांना वाटू लागले आहे. आनुवंशाच्या शास्त्राचा मानवाच्या बाबतीत अभ्यास करून त्याचे जोराने प्रवर्तन करणारा पंडित म्हणजे सर फ्रॅन्सिस गाल्टन हा होय. इंग्लंडमधील प्रसिद्ध शास्त्रज्ञ, सेनापती, वगैरे निरनिराळ्या क्षेत्रातील कर्त्या, थोर पुरुषांच्या कुलांचा अभ्यास करून याने असे सांगितले की थोर व्यक्ती या अनियमितपणे वाटेल त्या कुळात उत्पन्न होत नसून त्या व्यक्तीचे जवळचे आप्तसंबंधीही- पणज्या निपणज्यापर्यंतचे आप्तसंबंधीही- मोठे पुरुष असल्याचे आढळून येते. मानवाच्या मूल कर्तृत्वात फारसा फरक नसून परिस्थितीलाच सर्व महत्त्व आहे हे जे साम्यवाद्याचे म्हणणे ते अगदी भ्रामक असून मनुष्याचे कर्तृत्व बव्हंशी तो कोणच्या कुळात