पान:विचार सौंदर्य.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९४ 

विचार सौंदर्य

पुरुषांत पुष्कळदां स्त्रीची आकर्षकता दिसून येते व त्याच्या उलट प्रकार अनेक असामान्य स्त्रियांत दिसून येतो असा सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्यांनी आपला अनुभव सांगितला आहे. ज्याप्रमाणें मनुष्यांत पुरुषत्व-स्त्रीत्वांचें मिश्रण दिसून येतें, तसें वस्तूंतहि उदात्तत्व व सौंदर्य यांच्या मिश्रणाच्या रूपानें दिसून येतें. मनुष्य-स्वभाव-घटनेंत स्त्रीप्रकृतीचा जो अंश असतो त्याजवर वस्तूंतील उदात्त अंशाचें व त्या घटनेंतील पुरुष-प्रकृतीच्या अंशा- वर सुंदर अंशाचें आकर्षण घडतें. त्यामुळे उदात्त व सुंदर वस्तु सारख्याच सुखकर वाटतात."

 ही उपपत्ति मार्मिक आहे, व अंशतः खरी आहे. परंतु व्यक्तीमधील स्त्रीत्व पौरुषाकडे आकर्षिलें जातें व पौरुष स्त्रीत्वाकडे आकर्षिलें जातें हैं खरें असले तरी या आकर्षणाचें अधिक पृथक्करण करून त्याची मीमांसा करण्याचे काम टाळतां येत नाहीं. त्यांतली खरी गोष्ट अशी आहे कीं, कोणतीहि एक उपपत्ति पूर्णपणें यथार्थ नाहीं, तर प्रत्येकांत ग्राह्यांश आहे. असो. रसाबद्दलचा हा नीरस काथ्याकूट सोडून देऊन हरतऱ्हेचे रस ज्या मराठी नाटकांत, कादंबऱ्यांत, लघुकथांत, काव्यांत वगैरे दृग्गोचर होतात त्यासंबंधीं जे मला सांगावयाचें आहे तें सांगून आटोपतें घेऊं या. नाटक- कारांविषयीं कांहीं एक न लिहितां नाटकांसंबंधीं एकच गोष्ट पुनरावृत्तीचा दोष पत्करून सांगावीशी वाटते. ती अशी कीं, रसाचें अधिष्ठान रसिक प्रेक्षकांचें हृदय हे आहे, नाटककाराचें हृदय नव्हे, नटाचें नव्हे किंवा पात्रांचा अभिनय करावयाचा त्या पात्रांचें नव्हे, हें नाटककार च नटहि कित्येक वेळां विसरतात आणि म्हणून नाटकांत व अभिनयांत कित्येक वेळां कृत्रिमपणा, किंबहुना विकृतपणा दिसून येतो. खरा राम व खरी सीता हीं उभयतां एकमेकांना पाहून क्वचित् प्रसंगी कामाच्या किंवा क्रोधाच्या किंवा दुसऱ्या मनोविकाराच्या अधीन झाली असतील व त्यांनीं त्या त्या मनोविकाराला अनुसरून भाषणादि व्यवहार केला असेल, पण जेव्हां राम कामाकुल झाला असेल तेव्हां तेव्हां सीता हल्लींच्या नाटकगृहांतल्याप्रमाणें शृंगारिक चेष्टा किंवा हावभाव करीत होती असें मानण्याला आधार नाहीं. आसपास कोठें राम आहे याची कल्पना देखील मनांत नसतां ती कदाचित्