पान:विचार सौंदर्य.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८२ 

विचार सौंदर्य

हीं चित्रे पाहतांना त्याला आनंद झाला काय ? तीं चित्रे आहेत हें तो क्षणभर विसरला, म्हणून दुःख झालें असें म्हणणे क्षणभर टिकेल. कारण तीं चित्रे आहेत हे कळल्यानंतरहि तो उदासीन होतो हे आपणांला ठाऊक आहे. शोकात्मक काव्यांतले प्रसंग खरे नसतात, तर स्मृतिरूप, काल्पनिक व छायात्मक किंवा प्रतिबिंबात्मक असतात म्हणून रसोत्पत्ति होऊं शकते हैं म्हणणें जसें टिकत नाहीं त्याप्रमाणें हे प्रसंग हृदयवीणेंतील शोकतंतु फार अल्पांशानें व कोमलतेनें छेडतात हें म्हणणेंहि फार वेळ टिकणार नाहीं. कडव्या वालांत थोडासा कडूपणा असतो म्हणून कोंकणांतल्या लोकांना वाल खातांना एक प्रकारची गोडी वाटते; चैनीकरितां सहल करणाऱ्यांना थोडासा त्रास झालेला सुखकर होतो; त्याचप्रमाणे बायकोचा थोडासा राग किंवा रुसवा सुखकर होतो; आपला लहानसा आजार एक प्रकारचें सुख देतो. —हे सर्व अनुभव मला परिचित आहेत, परंतु या सर्व अनुभवांत सुख आहे तें त्यांतील अल्प दुःखात्मक अंशाने नव्हे तर त्यांत आनंददायी असे दुसरे अंश आहेत म्हणून. तेव्हां अल्प व कोमल आघात होतो म्हणून नाटकांतला किंवा काव्यांतला शोक रसोत्पत्ति करूं शकतो हे म्हणणे सोडलें पाहिजे. शोकगंभीर नाटकें (Tragedies) रसोत्पत्ति कशी करतात ह्याचें अॅरिस्टॉटलनें 'कॅथॅर्सिस् म्हणजे अन्तःशुद्धि' या तत्त्वांच्या आधारें जें विवेचन केलें आहे त्यांतील कॅथर्सिस् किंवा अंतःशुद्धि याचा कोणता अर्थ त्याला विव- क्षित होता हैं स्पष्ट नाहीं. तो विवादविषय आहे. ( १ ) होमिओपाथिक लोक ज्याप्रमाणे आपल्या लहानशा औषधी गोळ्या देऊन जो रोग बरा करावयाचा तोच अल्पांशानें उत्पन्न करतात, व अशा रीतीनें तो रोग बरा करतात. तसा प्रकार ॲरिस्टॉटलच्या कॅथॉर्सिसच्या उपपत्तींत गर्भित आहे असें कांहीं लोक म्हणतात. म्हणजे त्यांच्या मतें कृत्रिमतेनें पण अल्प प्रमाणांत शोक उत्पन्न केला म्हणजे शोकदोष निघून जातो व अन्तःशुद्धि होते आणि रसोत्पत्ति होते ! ( २ ) इतर कांहीं लोक म्हणतात कीं, शोकगंभीर नाटकें पाहिलीं म्हणजे आपल्या मनांतील त्या त्या भावनांच्या प्रवाहाला पाट फोडला जातो आणि अशा रीतीनें अंतःशुद्धि होते. अलीकडचे मनोगाहनी मानसशास्त्रज्ञ, म्हणजे Psycho-anlaysts, मानवी मनांतल्या गूढ व प्रबळ वासना अप्रत्यक्ष रीतीनें आपले समाधान करून घेतात असें म्हणतात व सिनेमांतील व नाटकांतील