पान:विचार सौंदर्य.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७६ 

विचार सौंदर्य


तरी मी तो पत्करीन !" ) सत्यभक्तीमुळे नरकांत जाण्याचा प्रसंग ओढवेल ही अर्थात् केवळ कल्पना आहे. असा विपरीत प्रसंग येणें मला तरी अशक्यप्राय वाटतें. माझी स्वतःची अशी समजूत आहे की सत्य हें बहुधा सत्कर्माला स्फूर्ति देणारें, उत्साहवर्धक व आनंददायक आहे. परंतु त्याचे परिणाम विपरीत होत आहेत अशी कल्पना करा, व मग तुम्ही सत्याचाच कास धरणार की काय हें आम्हांला सांगा, असा जर कोणी मला केवळ तात्त्विक चर्चेकरितां प्रश्न केला तर माझें उत्तर काय आहे हें दर्शविण्या- करितांच " To hell shall I go" ( मी नरकवास पत्करीन) हैं मिलचें वाक्य मीं उद्धृत केले आहे.

 एखादा मार्मिक मनुष्य साभिप्राय स्मित करून मला येथें हळूच म्हणेल कीं, " तुमचें ध्येय, तुमचा आवेश, तुमची सत्यप्रियता वगैरे सर्व ठीक आहे, पण 'सत्य' म्हणजे काय हें कृपा करून सांगाल काय ? सत्यनिर्णयाच्या बाबतीत तुम्हीं केवळ तर्कावर, – विवेकबुद्धीवर - Reason वर – विश्वास ठेवतां की परंपरा, आप्तवाक्य, सात्त्विक भावना (Emotions) व स्थिरवृत्ति (Sentiments) ह्यांना थोडेबहुत महत्त्व देतां ? उदाहरणार्थ, तुमच्या नैतिक, धार्मिक व सौंदर्यविषयक सत्प्रवृत्ति तार्किक विवेकबुद्धीच्या निर्णयाच्या उलट जाऊं लागल्या तर तुम्ही कोणत्या पक्षाकडे वळणार ? एकीकडे आपल्या परंपरागत धार्मिक व इतर कल्पना व स्थिरवृत्ति, आणि दुसरीकडे तार्किक अनुमानें, यांमध्यें कलह उत्पन्न होऊन हृदय विदारणा होण्याची पाळी येते असा अनुभव आहे. अर्जुनाला कसा पेंच पडला होता व त्याची कशी शोचनीय अवस्था झाली होती हैं तुम्हांला ठाऊकच आहे.

  सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।

  वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥

  गांडीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।

  न च शक्रोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः

 चित्तभ्रान्ति उत्पन्न करणारे अशा प्रकारचे अनुभव विचारी माणसाच्या आयुष्यांत वरील कारणांमुळे उत्पन्न होतात व ' किं कर्म किमकर्मेति कवयोप्यत्र मोहिताः ' यांत म्हटल्याप्रमाणे मोठ्या मोठ्या सुज्ञ लोकांना देखील काय करावें हें सुचत नाहीं. अशा स्थितींत सत्य कोणी कसें