पान:विचार सौंदर्य.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५६ 

विचार सौंदर्य


प्रियंवदा ' या कादंबरीच्या प्रस्तावनेंत त्यांनींच कबूल केल्याप्रमाणें तींतील कांहीं कालविपर्यासाचे दोष सवड व संधि मिळाली असती तर त्यांनींच काढून टाकले असते; परंतु इतर कांहीं दोष जे राहिले आहेत त्यांबद्दल त्यांच्या एकांगी व बेफिकीर वृत्तीला थोडें बहुत जबाबदार धरले पाहिजे, असें म्हटल्याशिवाय राहवत नाहीं. स्त्रियांनी केशरचनादिकांच्या द्वारें सौंदर्यप्रसाधन करावें, तरुणतरुणींनीं एकमेकांना आकर्षक होण्याचा प्रयत्न करावा, एकमेकांचें विलोभन करावें, असें आपल्या कादंबऱ्यांमध्यें मधून- मधून सुचविणाऱ्या लेखकानें आपल्या कलाकृतींच्या बाबतीत बाह्य वेषाकडे, भाषेकडे, रचनेकडे, मांडणीकडे दुर्लक्ष करावें, ही विसंगति लक्षांत ठेवण्यासारखी आहे !

 'गोंडवनांतील प्रियवंदा' या त्यांच्या पहिल्या कादंबरींत प्रियवंदा,बिंबा, शारदाबाई, घरकुट्टे घराण्यांतील पुरुष, हरिभय्या मोघे, वैजनाथशास्त्री इत्यादि अनेक स्त्रीपुरुषमंडळी आली आहेत. परंतु लक्ष्य केन्द्र किंवा आस्था- केन्द्र त्यांत नाहीं, एकमेकांचा संबंध कांहीं ठिकाणी कलादृष्ट्या शिथिल आहे, अशा प्रकारचा आक्षेप घेण्यांत येतो. या आक्षेपाला केतकरांनीं 'परागंदे'च्या प्रस्तावनेंत पुढील उत्तर दिले आहेः–“एखाद्या ग्रामाचा किंवा मनुष्यसमूहाचा आयुष्यक्रम सांगणाऱ्या युरोपीय वाङ्मयांत ज्या कादंबऱ्या आहेत त्यांमध्यें कथानकांची गुंतागुंत बरीच कमी असते. एक मोठा वृक्ष व त्याची अनेक बांडगुळे व त्यांत वेष्टणाऱ्या पण एकमेकांत गुंतलेल्या अशा अनेक बेली, अशा वनस्पतिसमुच्चयांर्शी त्या कादंबऱ्या तुल्य नसून एकमेकांशीं त्यांच्या फांद्या अडकल्या आहेत अशा स्वतंत्र बुंध्यांच्या वृक्षराजींशीं त्या तुल्य असतात. या प्रकारच्या कादंबऱ्यांशी ज्यांस परिचय नाहीं त्यांस 'प्रियंवदा ' ही कादंबरी 'शास्त्रीय नियमांनीं ' तयार झालेली नाहीं असें वाटलें. तथापि, ती कादंबरी कांहीं निराळ्या प्रकारचीच आहे हें कांहीं मार्मिक लेखकांनी ओळखलेंच. "

 'प्रियंवदा ' ही कादंबरी "कांहीं निराळ्या प्रकारची " आहे हें मींहि ओळखिलें. ती वाचनीय, आकर्षक, विचारप्रवर्तक आहे. परंतु केतकरांनी वृक्षराजीचा जो दाखला दिला आहे त्याच्यायोगें या कादंबरींतील बेडौलपणाचा व विस्कळितपणाचा आरोप वृथा ठरेल असे मला वाटत