पान:विचार सौंदर्य.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कादंबरीकार डॉ. केतकर

५५


हेत्वाभास हा आहे. संस्कृत वाङ्मयांत जीं तत्त्वें व सत्यें सांगितलेलीं आहेत तींच मराठी कवींनी सांगितलेलीं आहेत म्हणून त्यांना विशेष किंमत नसेल, नावीन्याच्या दृष्टीनें मराठी कवींनीं विशेष कांहीं केलें नसेल, तथापि जुनीं सत्यें त्यांना कळलीं होतीं इतकेंच नव्हे तर पटलीं होतीं, त्यांना आनंद झाला होता व हा आनंद लोकांना व्हावा एवढ्याकरितां त्यांनीं त्या सत्यांची मांडणी सुंदर, आकर्षक रीतीनें केली, आणि जनतेच्या सात्त्विक व कलात्मक आनंदांत भर घातली, हें त्यांचें ( तत्त्वप्रगतीच्या दृष्टीनें नसले तरी ) कलेच्या दृष्टीने महत्त्वाचें कार्य होतें. केतकरांना वाटावयाचें कीं, मनुष्यस्वभावांतील व समाजरचनेंतील कांहीं सत्यें स्वतःस कळलेलीं आहेत आणि तीं लोकांच्या नजरेला आणून दिलीं म्हणजे त्यांना आनंद होईल. पण, सत्यदर्शन हैं नेहमींच आनंददायक होतें असें नाहीं. ज्यांची जिज्ञासा तीव्र असते आणि ज्यांना एखाद्या विषयाबद्दल विशेष आस्था असते, त्यांनाच केवळ सत्यदर्शन हैं आनंददायक होतें. इतरांना तें आनंददायक होईल अशा रीतीची दक्षता बाळगून तें सांगितले तरच तें आनंददायक होईल. कलावन्तानें या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालावयाचें नाहीं. किंबहुना जो कलावन्त हैं जाणतो तोच उत्तम कलावन्त गणला जातो.

 केतकरांच्या कादंबऱ्यांमध्यें तत्त्वप्रतिपादन अतिशय आलेले आहे हा दोष, विशिष्ट व्यक्तींची आठवण होईल अशा प्रकारचे उल्लेख आहेत हा दोष, आस्थाविषयीभूत प्रतिपादनाचें किंवा तत्वाच्या घटनेचें किंवा कार्या चें जें ऐक्य (unity of interest) कलाकृतीमध्यें लागत असतें त्याचा अभाव हा दोष, त्याचप्रमाणें लोकविलक्षण नीतिप्रतिपादन हा दोष, हे खरोखर दोष आहेत किंवा नाहींत व असल्यास कितपत व कोणत्या अर्थाने आहेत याचा विचार पुढें करूं;-कारण, त्यांच्या या खऱ्या किंवा आपाततः भासणाऱ्या दोषांच्या पाठीमागें त्यांची एक विशिष्ट विचारसरणी होती -- परंतु सध्यां भाषेचा क्लिष्टपणा, अव्यवस्थितपणा ओबडधोबडपणा, कांहीं विषयांचा पाल्हाळ, कथानकाची विस्कळित व प्रमाणदुष्ट रचना हेच दोष विचारांत घेतां त्यांबद्दल त्यांच्या बेफिकीर वृत्तीकडे व कलाविषयक गैरसमजाकडे त्यांची जबाबदारी जाते हैं मला सांगावयाचें आहे. वेळेचा अभाव,कार्यवैपुल्य हीं कारणें आहेतच. उदाहरणार्थ, 'गोंडवनांतील