पान:विचार सौंदर्य.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

५१

केलेली असतात. एका पुस्तकांत सहजगत्या माझ्या ध्यानांत आलें कीं, एका पानांत सात आठ वेळां ' झाले तरी ' ' झाला तरी ' हे शब्द आले आहेत. पण तें पान आतां सांपडत नाहीं. पण त्यांचे कोणतेंहि पुस्तक व कोणतेंहि पान उघडलें तरी हा विशेष माझ्या ध्यानांत येतो व इतरांच्याहि ध्यानांत आला असेल किंवा येईल असे वाटतें. गड्याला अंगावर घेऊन त्याला फेकून देण्यांत ते फार कुशल आहेत. हे कौशल्य त्यांच्या स्वभावविशेषामुळे आलेलें आहे. समतोलपणानें, सारसार विवेक करून, सहानुभूतीनें, किंबहुना औदार्यपूर्वक दुसन्याकडे पाहावयाचें, व आपल्याप्रमाणेंच त्याचीहि एक विशेष दृष्टि असेलच आणि त्या दृष्टीनें त्याचेंहि बरोबरच असेल, ही जाणीव नेहमीं मनांत असावयाची, आणि दोष दिसले तर होता होईतों हलक्या हातानें दाखवावयाचे, हा त्यांचा स्वभावविशेष आहे. हा विशेष त्यांच्या टीकाकाराला फार नडतो !

माझी दुसरी तक्रार अशी कीं, ते उपमा, दाखले वगैरे इतके चांगले देतात आणि भाषा अशी सजवतात कीं, टीकाविषयीभूत लेख टीकार्थ वाचीत असतां त्यांकडेच लक्ष जाते आणि त्यांतच रममाण होऊं पहातें ! पण या क्षुल्लक तक्रारी सांगितल्यानंतर इतकें विविध, इतकें विद्वत्त्वपूर्ण आणि विनोदादि-गुणसंपन्न टीकात्मक वाङ्मय लिहिणाऱ्याचें आदरयुक्त व सविस्मय कौतुक जें वाटतें तें व्यक्त केल्याशिवाय मात्र रहावत नाहीं. केळकर केवळ साहित्यचर्चा करणारे असते तरी देखील मराठी वाङ्मयांत उच्च स्थान पटकावते; मग केवळ रसज्ञ व विविधांगी टीकाकारच नव्हे तर संपादक, नाटककार, लघुकथालेखक, नर्मटीकालेखक, ग्रंथपरीक्षक, चरित्रकार, इतिहासमधुग्रहणपटु, या नात्यानें त्यांच्याकडे पाहूं लागल्यावर पुनः हेच केळकर राजकारणव्यापृत, अनेकविध-परकार्य-निरत, देश-काल-वर्तमान- ज्ञाते असून त्यांच्यामध्ये सुधारणानुकूल स्वधर्माभिमान आहे, विवेकयुक्त देशाभिमान आहे, ध्येयवादित्व आहे, व्यवहारज्ञता आहे; हैं सगळें ध्यानांत घेतल्यावर त्यांच्या असामान्य अष्टपैलूपणाबद्दल महाराष्ट्राला व बृहन्महा- राष्ट्राला जो प्रेमयुक्त आदर घाटतो तो अत्यंत यथार्थ आहे याची प्रचीति येते.

                                      * * *