पान:विचार सौंदर्य.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४२ 

विचार सौंदर्य


उदात्तत्वादि गुणांमध्यें (किंवा कांटेकोरपणे बोलावयाचें म्हणजे त्यांच्या प्रतीतींत) आनंददायकत्व आहे व हें आनंददायकत्व उपरिनिर्दिष्ट अनेक रीतींनीं होत असतें. या आनंदांत सविकल्प समरसत्व असतेच; पण त्याला भलतेंच महत्त्व न देतां वस्तुगत किंवा वर्णनगत रम्यत्वास व इतर कारणांस योग्य महत्त्व दिले जाईल अशी उपपत्ति असेल तरच ती पूर्णपणें मान्य होईल, नाहीं तर एकांगी, अतएव अमान्य होईल.

  सौंदर्यविषयक आनंदाची मीमांसा करतांना एका घटकाचा मात्र अवश्यमेव उल्लेख केला पाहिजे. त्याला नांव कांहीं देतां येत नाहीं, कारण तो अनिर्वचनीय आहे. सौंदर्याची किती जरी मीमांसा केली तरी त्यांत कांहीं तरी अनिर्देश्य असा भाग रहातोच, त्याचप्रमाणें सौंदर्यजन्य आनंदाचेंहि आहे. मनुष्यानें पृथक्करण करावें, चर्चा करावी, वादविवाद करावा, पण अखेर काव्यादिकांच्या सौंदर्यात व तजन्य आनंदांत कांहीं तरी शब्दातीत व केवळ हृदयसंवेद्य असें असतें हेंहि कबूल करावें. एखादी वस्तु किंवा एखादी व्यक्ति आपणांस प्रिय होते व आनंद देते, त्यांत कांहीं तरी शब्दांच्या व विचारांच्या कक्षेबाहेरील असा 'आन्तर हेतु' असतो -

व्यतिषजति पदार्थानान्तरः कोऽपि हेतुः
न खलु बहिरुपाधीन् प्रीतयः संश्रयन्ते ॥

 - हें तत्त्व, पृथक्करणात्मक मीमांसेचा प्रयत्न किंवा तद्विषयक उत्साह कमी होऊं न देतां ध्यानांत धरणे आवश्यक आहे. आपल्या अपूर्णावस्थेतलीच अर्थात् ही असमाधानकारक स्थिति आहे. पूर्णावस्थेंत पूर्ण ज्ञान होऊन पूर्ण आनंदाचा अनुपम उपभोग घेण्यास सांपडेल; तोपर्यंत आपल्या मीमांसेची मर्यादा ओळखलेली बरी.

 वर उल्लेखिलेल्या निर्वचनीय व अनिर्वचनीय अशा उभयविध काव्यानंदकारणांचा उल्लेख न करतां केवळ सविकल्प समाधीचाच उल्लेख करणें हें मला सदोष वाटतें. कारण, या उपपत्तींत एका अंगाचा जरी उल्लेख केलेला असला तरी दुसऱ्या व अधिक महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. काव्यानंदात्मक जो अलौकिक अनुभव आहे तो संमिश्रस्वरूपाचा आहे. त्यांत 'स्व' चें ज्ञान असतें, 'स्व' पूर्णपणें लुप्त होत नाहीं, हें केळकरांनी दाखविले आहे, तें बरोबरच आहे. त्याचप्रमाणें