पान:विचार सौंदर्य.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८ 

विचार सौंदर्य


आनंद काय, अनेक कारणांनी उत्पन्न होत असतो. विशिष्ट वेळीं किंवा विशिष्ट व्यक्तींच्या बाबतींत निरनिराळीं कारणे प्रधानत्वेंकरून प्रभावशाली होत असतील; पण व्यक्तिभेद, प्रसंगभेद वगैरे येथें न मानतां त्यांचा येथें थोडक्यांत निर्देश करतो.

 ( १ ) एक कारण असें कीं सहजसुंदर किंवा कलानिर्मित सुंदर वस्तु बहुधा इन्द्रियांना सुखकर असते. फुलें, नद्या, हिरवळ हीं नयनानन्ददायक असतात. चित्रे वगैरेहि अर्शीच असतात. काव्ये कर्णमधुर असतात. शिवरामपंत परांजप्यांसारख्यांच्या वक्तृत्वांत ( इतर गुणांबरोबर ) आवाजाची माधुरी हा एक गुण असतो. गालिचा स्पर्शसुख व नयनसुख देतो. फुलें, अत्तरें वगैरे घ्राणेंद्रियास सुखवितात. स्त्रियांच्या सौंदर्याने होणाऱ्या आनंदांत नयनादि इन्द्रियांच्या संभाव्य सुखांचा अंतर्भाव थोड्याबहुत प्रमाणांत कित्येक वेळां असतोच. 'सुभाषित व विनोद' या ग्रंथांत हास्यरसापासून कां आनंद होतो त्याचें विवेचन करतांना रुधिराभिसरण वाढतें, जीवपेशींना चालना मिळते व इन्द्रियांवरील ताण हास्यरसापासून कमी होतो इत्यादि जें विवेचन केळकरांनी केले आहे त्याचीहि येथें कांहीं जणांना आठवण होईल.

 ( २ ) सहजसौंदर्य-जन्य आनंदाचें किंवा काव्यादिकला-जन्य आनंदाचें दुसरें एक कारण असे की, तन्निर्मिति करणाऱ्याशीं आपली एक प्रकारची समरसता उत्पन्न होऊन त्याच्या सामर्थ्याची, बुद्धिवैभवाची, कौशल्याची, सहृदयतेची वगैरे आपणांस प्रतीति होते; व आपणांमध्ये आश्चर्य, आदर, वगैरे भावना उत्पन्न होऊन त्यांचा अलौकिक असा परिपोष होतो. बार्गेतलें सुंदर फूल पाहिलें म्हणजे मोहरीहून लहान अशा बीजापासून सुसंगत आकारानें व रंगांनी युक्त असें सुवासिक फूल, काळी माती, पाणी, हवा व प्रकाश यांशिवाय दुसऱ्या कशाचे साहाय्य न घेतां, एका रात्रीं, कोणाला न कळतां, स्तब्धपणें, खटाटोप वगैरे न करतां, उत्पन्न करणाऱ्या-एकच फूल नव्हे तर फळे वगैरे अनंतविध वस्तु अनंतकालापासून उत्पन्न करीत असलेल्या-अबुद्धिगम्य जगदात्म्याच्या अद्भुतरम्य चातुर्याचें व सामर्थ्याचें कोणाला कौतुक वाटणार नाहीं ? हुबेहुब चित्र काढणाऱ्या चिताऱ्याचें आपण कौतुक करतो त्याचें एक कारण हें कीं, असली चित्रे आपणांस साधत नाहींत व आपण त्याच्या कलाकौशल्यानें चकित होतों. (आपले कौशल्य वाढलें म्हणजे हा आनंद