पान:विचार सौंदर्य.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३६ 

विचार सौंदर्य


पावतों व त्यांचे अंतरंग जणूं कांहीं आपणाला क्षणभर कळून त्याचें वैभव आणि कौशल्य पाहून आपण आनंदित होतों. त्याचप्रमाणे वरील गाईच्या व वासराच्या,तसेंच तैलचित्राच्या व शब्दचित्राच्या उदाहरणांत आपण चित्रकारांशीं व कवींशीं तद्रूप होतो आणि आपली भूमिका तर सोडीत नाहीं म्हणून आनंद होतो; असें उत्तर देतां येण्यासारखे आहे, पण हें उत्तर केळकरांच्या उदाहरणांवरून तरी त्यांना विवक्षित आहे असे दिसत नाहीं. कारण त्यांच्या उदाहरणांत कण्व, अज, पांडव इत्यादि पात्रांशी आपण तादात्म्य पावतों असे म्हटले आहे; हे प्रसंग वर्णन करणाऱ्या कालिदास व मुक्तेश्वर कवीश तादात्म्य पावतों असें म्हटलेलें नाहीं.

 अचेतन सृष्टीर्शी तादात्म्य कसें पावावयाचें हा प्रश्न केळकरांनीं रस व अलंकार यांतील त्यांनीं जो भेद दाखविला तो दाखवितांना उत्पन्न झाल्यासारखा दिसतो, पण त्याचें महत्त्व पुरतेपणीं त्यांच्या ध्यानांत आल्यासारखें दिसत नाहीं. ते म्हणतात,"रस व अलंकार यांच्या स्वरूपांत इतकाच फरक कीं, रसाचे स्थायीभाव जीवसृष्टीच्या भावनांवर अधिष्ठित असतात व अलंकाराचे स्थायीभाव अचेतन सृष्टीवरहि अधिष्ठित होऊं शकतात. स्त्रीला लतेची उपमा दिली असतां आनंद होण्याचें कारण हेंच कीं, समगुण अशा दोन पदार्थांचा अनुभव एकदम घेतां येतो इत्यादि इत्यादि." केळकरांनीं लतेला अचेतन म्हटले आहे तें चिन्त्य आहे, पण तें सोडून देऊन " स्थायीभाव सृष्टीवर अवलंबून असतात या म्हणण्याचा अर्थ काय याचा विचार करूं या. [ हा विचार करतांना एक अशी गोष्ट ध्यानांत येते कीं केळकर हे 'भाव' हा शब्द शास्त्रीय कांटेकोरपणानें न वापरतां कित्येक वेळां ढिलेपणानें वापरतात. उदाहरणार्थ,"सुभाषित आणि विनोद" या पुस्तकांत पृष्ठ २० मधील ३४ व्या कलमांत “ अंतःकरणाची जी सहज व स्वाभाविक वृत्ति तिला भाव असें म्हणतात" असे सांगून लगेच २१ पृष्ठावर "रसानुकुलविकृतिर्भावः" अशीहि एक व्याख्या देतात व त्यांची एकवाक्यता किंवा तथ्यातथ्यता दाखविण्याचा प्रयत्न करीत नाहींत. पृष्ठ २२ वर " सात्त्विक भाव म्हणजे सुखदुःखादि भावांनीं भावित असें अंतःकरण त्यापासून उत्पन्न होणारे जे भाव ते " असे त्यांनी म्हटलेलें आहे व 'भाव' शब्दाच्या अर्थाबद्दल अधिकच